Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रुग्णांना फळे वाटप करून साजरा डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रुग्णांना फळे वाटप करून साजरा डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आमचा विदर्भ - दीपक शर्मा भद्रावती (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -         भद्रावतीत...
रुग्णांना फळे वाटप करून साजरा डॉ श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -
        भद्रावतीतील ग्रामीण रुग्णालयात खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व श्रीमती मिनलताई आत्राम, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी चंद्रपूर यांनी केले. 

        यावेळी रुग्णांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यात सौ. मिनलताई आत्राम, नानाभाऊ दुर्गे (नगरसेवक भद्रावती), योगेश म्यॅनेवार, विवेक दुर्गे, अभय दुर्गे, सचिन जयस्वाल, वैभव बावणे आणि अन्य शिवसैनिकांचा समावेश आहे. हा उपक्रम लोकसेवेमध्ये आणि समाजामध्ये एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आणि रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास कारणीभूत झाला.

#deshrikantshinde #shrikantshinde #kalyan #khasdar #shivsena #shivsenashinde #fruitdistribution #patient #hospital #bhadrawati #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top