आयटक महिला संमेलनात टी.सविता यांचे गौरवोद्गार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) -
वेकोलि कामगार भूगर्भातील कोळसा उत्पादन करून देशाच्या उर्जा क्षेत्राची गरज पुर्ण करतात. देशाच्या औद्योगिकीकरणात उर्जेची प्रचंड आवश्यकता असून जीडीपी वाढीसाठी कोळसा क्षेत्र मोलाची कामगिरी बजावत आहे. या कोळसा कामगार कुटूंबातील आपण सर्व महिला आपल्या घराची जबाबदारी योग्य रितीने सांभाळून कामगार बंधूंना सहकार्य करीत ख-या अर्थाने राष्ट्र उभारणीत मोठा सहभाग नोंदवित असल्याचे प्रतिपादन वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय कल्याण समितीच्या प्रमुख टी. सविता यांनी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले.
राजुरा तालुक्यातील कोळसा खाण कामगारांच्या धोपटाळा कामगार वसाहतीतील मनोरंजन केंद्रात दिनांक 17 जानेवारीला दुस-या महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रीय कल्याण समिती प्रमुख टी. सविता यांनी भुषविले. प्रमुख अतिथी वेकोलिच्या वित्तीय अधिकारी श्रीमती सुधामनी, स्थापत्य विभाग अधिकारी श्रीमती श्रेया सुपेकर, कार्मिक विभागाच्या अधिकारी श्रीमती निलम कुळकर्णी, कायदे विभागाच्या श्रीमती शिवानी बिस्ट, श्रीमती केतकी, श्रीमती सुमाश्री या व्यासपीठावर उपस्थित होत्या.
संक्रांती सणानिमीत्त विविध स्पर्धा व खेळांचे आयोजन करण्यात आले आणि विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमात उपस्थित 220 महिलांना तिळगुळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. आयटक कामगार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या सपना चन्ने, अर्चना लांडे, उषा बोबडे, संगिता हिवराळे, उषा पेटकर, सिमरन, स्वेता इराला, शोभा कटकम, सुषमा पिंपळशेंडे, निकिता थेरे, सुनीता मोरे, सिमा कावळे, शारदा गेडाम आणि अन्य महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले. कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संयुक्त खदान मजदूर संघाचे बल्लारपूर क्षेत्रीय सचिव दिलीप कनकुलवार यांनी सर्व सदस्यांचे व महिलांचे आभार मानले.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #wcl #coalindia #coalmines #workers #kamgar #energysector #Industrialization #coalworkers #wcl #ballarpurarea #dhoptalatownship #sastitownship #AreaWelfareCommittee
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.