Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पांढरपौनी येथे शेतात विज प्रवाहाच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पांढरपौनी येथे शेतात विज प्रवाहाच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले राजुरा (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) -         राजुरा ता...
पांढरपौनी येथे शेतात विज प्रवाहाच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले
राजुरा (दि. ०३ फेब्रुवारी २०२५) -
        राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथे करण घनश्याम मुनघाटे, वय 17 हा मुलगा शेतात गेला असता विजेचा प्रवाह वाहत असलेल्या तारा सोबत संपर्क झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिनांक 2 फेब्रुवारीला सायंकाळी ही दुर्घटना घडली.

        पांढरपौनी या गावशिवारात करण च्या वडीलांची शेती आहे. या शेताशेजारी राजेश पांडूरंग गिरसावळे यांची शेती आहे. करण हा दुपारी आपल्या ज्वारीच्या शेतात गेला असता राजेश गिरसावळे यांच्या शेतातील तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. याची जाणीव करणला नव्हती. यावेळी विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तो जागीच मृत्यूमुखी पडला. याची माहिती मिळताच गावक-यांनी विद्युत विभाग व पोलिसांना माहिती दिली. राजुरा पोलिसांनी रात्री पांढरपौनी येथे जाऊन प्रेताला राजुरा येथे शव विच्छेदनासाठी आणले आणि आरोपीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान सकाळी सर्वत्र घटनेची माहिती होताच येथे बराच तणाव निर्माण झाला. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत प्रेताचे शवविच्छेदन करण्यास गावक-यांनी विरोध केला. अखेर गावक-यांना शांत केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येऊन उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

        राजुरा पोलिसांनी या घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवध कलम 105 अंतर्गत आरोपी राजेश गिरसावळे याचेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक उरकुडे अधिक तपास करीत आहेत.

#death #pandharpouni #currentofelectricity #Deathonthespot #farmer #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top