आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
वर्धा (दि. ३० जानेवारी २०२५) -
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. कृपाशंकर चौबे यांनी महात्मा गांधी यांच्या मुर्तीला सूतमाळ अर्पण करून अभिवादन केले. गुरुवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून गांधी हिल्स वर 'शहीद दिन' आयोजित करण्यात आला. गांधी व शांती अध्ययन विभागाचे अध्यक्ष डॉ. राकेश कुमार मिश्र कार्यक्रमाचे संयोजक होते.
यावेळी विश्वविद्यालयातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी आणि विद्यार्थ्यांनीही पुष्पांजली अर्पण केली आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी, "वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड परायी जाने रे" आणि ‘दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ अशी भजनं सादर करण्यात आली. या कार्यक्रमात क्षेत्रीय केंद्र कोलकाता, प्रयागराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा आणि तत्वज्ञान अध्ययन केंद्र, रिद्धपूर, अमरावती येथील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.
#aamchavidarbha #vidarbha #wardha #mahatmagandhipunyatithi #mahatmagandhiaantarrashtriyahindivishvavidyalaya
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.