Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: एसीबीच्या जाळ्यात अडकला लाचखोर कृषी सहायक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एसीबीच्या जाळ्यात अडकला लाचखोर कृषी सहायक शेतकऱ्याकडून स्प्रे पंप करिता केली होती एक हजार रुपयाची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्र...
एसीबीच्या जाळ्यात अडकला लाचखोर कृषी सहायक
शेतकऱ्याकडून स्प्रे पंप करिता केली होती एक हजार रुपयाची मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. ०५ फेब्रुवारी २०२५) -
       भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी येथील शेतकरी यांची नंदोरी येथे शेती असुन त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे महाडिबीटी योजनेअंतर्गत शेतमाल फवारणीकरीता बॅटरी स्प्रे पंप मिळणेकरीता सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता. त्यानुसार तक्रारदार यांना फवारणी स्प्रे पंप सप्टेंबर/२०२४ मध्येच मंजुर करण्यात आलेला होता. त्यानुसार दिनांक ०७/१०/२०२४ रोजी चंदनखेडा येथे कृषी विभागामार्फत स्प्रेपंप वाटप झाले होते, मात्र तक्रारदार शेतकरी हे बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप घेवू शकले नाही.

       त्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जावून कृषी सहायक सरजीव अजाबराव बोरकर यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देणे करीता ते टाळाटाळ करीत होते. त्यानंतर दिनांक ०३/०२/२०२५ रोजी सरजीव बोरकर यांनी तक्रारदार यांना फोन करून शेतीसाठी उपयोगी असलेले फवारणी पंप देणेकरीता १०००/- रूपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. तकारीवरून दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून पडताळणी करून कारवाईचा सापळा रचला. पडताळणी कार्यवाहीदरम्यान सरजीव बोरकर यांनी तक्रारदार यांचे कृषी विभागांतर्गत मंजुर फवारणी पंप देण्याचे कामाकरीता १०००/- रूपये लाच रक्कम मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून नंदनवन प्रवेशद्वार वरोरा येथे पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान कृषी सहायक बोरकर यांनी एक रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरू आहे.

हे हि वाचा........

        सदरची कार्यवाही दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर व श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद गुरनुले, पोशि वैभव गाडगे, पोशि अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि.पुष्पा काचोळे व चापोशि सतिश सिडाम सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी केली.

#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #acb #anticorruptiondepartment #chandrapur #TalukaAgricultureOfficer #TalukaAgricultureOfficerBhadravati #farmer #majari #nandori #agriculturedepartment #Batteryspray

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top