Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शुल्लक कारणावरून युवकाची भरदिवसा हत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शुल्लक कारणावरून युवकाची भरदिवसा हत्या बिबी येथील रामनगरमधील घटना आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि. ०६ फेब्रुवारी...
शुल्लक कारणावरून युवकाची भरदिवसा हत्या
बिबी येथील रामनगरमधील घटना
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ०६ फेब्रुवारी २०२५) -
        तालुक्यातील बिबी येथील रामनगरमधील शिवराज पांडुरंग जाधव (२१) या युवकाची शुल्लक कारणावरून चाकूने गळ्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून भर दिवसा हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवार दि. ६ ला दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली.

        अविनाश राधाकृष्ण पिल्ले (३०) व आशिष राधाकृष्ण पिल्ले (२४) रा. रामनगर बिबी अशी आरोपीची नावे आहे. सविस्तर वृत्त असे की, घरगुती विषयावरून मृतक व आरोपींचा वाद झाला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अविनाश पिल्ले ह्याने त्याच्या भावाच्या मदतीने शेजारी राहत असलेल्या शिवराजची हत्या करून कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्याला फेकून दिले.

         घटनेची माहिती मिळताच गडचांदूर येथील ठाणेदार शिवाजी कदम सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेत संपूर्ण परिवार सहभागी असल्याचा आरोप उपस्थित वार्ड वासीयांनी केला व संपूर्ण परिवाराला हत्या प्रकरणात आरोपी बनवण्याची मागणी केली. हत्या करतात अविनाश पिल्ले ह्याने पोलिसांना समर्पण केले असून दुसरा आरोपी व आई वडील पोलिसांच्या हाती लागले नाही. आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.

आरोपीची पार्श्वभूमी
        आरोपींवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून वार्डात महिलांना धमकी देणे, चाकू दाखविणे, अश्लील शिवीगाळ करणे व लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे असे अनेक आरोप आहे. त्यात आरोपीला त्याच्या आई-वडिलांचे सुद्धा सहकार्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराला येथून स्थानबद्ध करण्याची मागणी नागरिकांनी केली.

#murder #Murderofayouth #korpna #bibi #nandaphata #ramnagar #policestationgadchandur #aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top