आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 14 फेब्रुवारी 2025) -
हिरापूर (hirapur) येथे संत जगन्नाथ बाबा वार्षिक महोत्सव व श्री संत वामन बाबा प्रगट दिन (sant waman baba prakat din) सोहळयाचे आयोजन पंचमुखी नंदीगड देवस्थान हिरापुर तर्फे करण्यात आले. यानिमित्याने गावात पालखी काढण्यात आली. या (palakhi) पालखीत तीस हरी भजन मंडळ सहभागी झाले होते. (marai patan) माराई पाटण गायक अरविंद कुमरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात जगन्नाथाचा गजर करत हजारो भाविक भक्तात समवेत मिरवणुकीची शोभा वाढवली. सर्व रंजल्या गांजल्या भाविक भक्ताचे दुःख निवारण करणाऱ्या संतांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. श्री संत वामन बाबा व श्री संत खेमराज बाबा यांनी श्री गणेशाला, जगन्नाथ बाबा व विठुरायाला दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली. ह.भ.प.सुरपाम महाराज वरोरा यांनी काल्याचे कीर्तन केले. पंचमुखी नंदिगड देवस्थान चे (ananta gokhare) अध्यक्ष अनंताजी गोखरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन अमोल पावडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यश्वीतेकरिता मोहन पावडे, पुरुषोत्तम भोयर, उत्तम घाटे, किसन पाचभाई, मारोती गोखरे, उत्तम बोबडे, नागोबाजी मडचापे, प्रवीण पावडे, पंकज कनाके, गजानन मडावी, संतोष मोहितकर, अक्षय माथुलकर, विष्णू पावडे, मंगेश डाहुले, कवडू बल्की, सुधीर खोकले महाराज, दयाशंकर बावणे यांनी परिश्रम घेतले.
#aamchavidarbha #vidarbha #maharashtra #chandrapur #rajura #santjagannathbabavarshikmahotsav #santwamanbabaprakatdin #hirapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.