Matri Pitru Poojan Day ; मातृ पितृ पूजन दिन उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 14 फेब्रुवारी 2025) -
4 फेब्रुवारी (14th February) या दिवसाचे महत्व कोणालाही विचारले तर अनेकजण आज ‘व्हॅलेंटाईन दिवस’ (Valentine day) आहे, प्रेम दिवस आहे असे सांगतात. मात्र, या सर्वांसोबतच मातृ-पितृ पूजन दिवस (Matru pitru pujan diwas) हेही आजच्या दिवसाचे महत्व आहे. आज ज्याप्रमाणे प्रेमदिवस साजरा करतात त्याप्रमाणेच अनेकजण आपल्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांचा आशिर्वाद घेत मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करतात.
(Sonia Gandhi English Public School) सोनिया गांधी इंग्लिश पब्लिक स्कूल व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मातृ पितृ पूजन दिवस सोनिया गांधी शाळेच्या परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विस्तार अधिकारी प्रकाश तेलीवार, नेफडोच्या नागपूर विभाग अध्यक्षा सूनैना तांबेकर, तालुका अध्यक्ष किरण हेडाऊ, माधुरी कुळकर्णी, मिलींद गड्डमवार, माधुरी डफाडे, कृतीका सोनटक्के, अरूणा बुटले, अंजली गुंडावार, पुजा घरोटे, संतोष देरकर, मनोज तेलीवार, मंदा सातपुते, माधुरी गड्डमवार आदींची उपस्थिती होती.
संचालन सुषमा वडस्कर, प्रास्ताविक कृतिका सोनटक्के यांनी तर आभार पूजा रासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून गीतगायन शिक्षीका प्रज्ञा वैद्य यांनी केले. विशेष अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम अन्सारी, उपप्राचार्य रफत शेख, सकाळ पाळी प्रमुख प्रमिला रोगे, सपना मानकर, नीता ब्राह्मणे, सुषमा दरेकर आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पितांचे व शिक्षकांचे पूजन केले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे ज्येष्ठ पदाधिकारी, सदस्य, संघटक यांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आई - वडील, गुरू, आणि ज्येष्ठांचे मानवी जीवनातील स्थान व महत्व विषद केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.