Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेची कार्यकारिणी जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेची कार्यकारिणी जाहीर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमचा विदर्भ - अनंता गोखरे जिवती (दि. १७ जानेवारी २०२४) -  ...
जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेची कार्यकारिणी जाहीर
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
जिवती (दि. १७ जानेवारी २०२४) - 
        डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भवन जिवती येथे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीतील नवीन पदाधिकाऱ्यांच्या माजी आमदार ॲड वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ पाटील कोरांगे, सुनील बावणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत स्वागत व सत्कार करण्यात आला. 

         नवनियुक्त तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आपाआपले नेतृत्व जोपासून जबाबदारीने पक्षाचे संघटन व बांधिलकी मजबूत करण्यात आपला बहुमूल्य वेळ पक्ष नेतृत्वाला देऊन तसेच गावोगावी बूथ स्तर, सर्कल स्तर सलोखा निर्माण करून पक्षाला खंबीर नेतृत्व द्यावे असे प्रतिपादन या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नेते ॲड वामनराव चटप, नीलकंठ कोरांगे, अरुण नवले यांनी केले. ॲड. दिपक चटप यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत जिवती हा तालुका पहाड, डोंगर, दऱ्यांनी असल्याने शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी बहुल तालुक्यात आजही गावोगावी चळवळीला प्रत्येक घटकातील माणसाची साथ मिळताना दिसते आहे. याप्रसंगी युवा नेतृत्वाला संधी देणे म्हणजे पक्षाची तालुकानिहाय बाजू भक्कम करून भविष्य वेधांतीक वाटचाल करणे होय असे सांगितले. 
        या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर दत्ता राठोड, सुदाम राठोड, गणेश कदम, परमेश्र्वर वारे, शबिर जहागिरदार, नरसिंग हामने, रामेश्वर नामपले, त्र्यंबक सुर्यवंशी, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कनाके, विशाल राठोड, जमीर सय्यद, निखिल मडावी, उद्धव गोतावळे आदी उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक ॲड दिपक चटप यांनी केले.

#shetkarisanghatna #swatantrabharatpaksha #advwamanraochatap #deepakchatap #jiwati #rajura #vidarbha #chandrapur #maharashtra #aamchavidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top