Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वामी विवेकानंदांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्पद - ॲड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वामी विवेकानंदांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्पद - ॲड. वामनराव चटप  आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी राजुरा (दि. १५ जानेवार...
स्वामी विवेकानंदांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्पद - ॲड. वामनराव चटप 
आमचा विदर्भ - निशा मोहुर्ले, शहर प्रतिनिधी
राजुरा (दि. १५ जानेवारी २०२५) -
        स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekananda Jayanti) रामपुर येथील स्वामी विवेकानंद अनाथाश्रम (swami vivekanand anathaashram) येथे दिनांक 12 जानेवारीला साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप होते (Adv. Wamanrao Chatap). प्रमुख अतिथी ॲड. मुरलीधर देवाळकर, डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, मारोतराव येरणे, भाऊराव बोबडे, (Ranganath Swamy Nagari Sahkari Patsanstha) रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजुरा शाखेचे व्यवस्थापक देवेंद्र डुकरे, मंगेश उरकुडे, दादाजी धानोरकर, देवराव काळे, मयुर साळवे, जीवनदास हेपट आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, जिजामाता आणि स्वामी विवेकानंद या दोन्ही महान व्यक्तित्वाची आज जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचे जीवन सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्पद असूून विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमन करण्याची गरज आहे. जिजाऊने शिवाजी महाराज घडविण्यासाठी घेतलेल्या कष्टाची व दूरदृष्टीची इतिहासात तोड नसल्याचे मत मांडले. प्रास्ताविकात ॲड.मुरलीधर देवाळकर यांनी संस्थेची प्रगती व कार्यकलाप याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याविषयी भाषणे दिली. श्री.रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या राजुरा शाखेद्वारे अनाथालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोशाख, बुट व अन्य भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले.

        कार्यक्रमाचे संचालन भाऊराव बोबडे व आभारप्रदर्शन अधिक्षक प्रविण गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला रामपूर येथील नागरिक व संस्थेच्या वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

#AdvWamanraoChatap #SwamiVivekanandaJayanti #rajura #chandrapur #vidarbha #maharashtra

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top