Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पुरवठा विभागाची वेबसाईट दोन महिन्यापासून बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पुरवठा विभागाची वेबसाईट दोन महिन्यापासून बंद अन्नासाठी गरजवंताच्या तहसील कार्यालयात चकरा चक्क पाच वर्षांपासून नाही मिळाले अन्न मुख्यमंत्री द...
पुरवठा विभागाची वेबसाईट दोन महिन्यापासून बंद
अन्नासाठी गरजवंताच्या तहसील कार्यालयात चकरा
चक्क पाच वर्षांपासून नाही मिळाले अन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील काय?
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १७ जानेवारी २०२४) -
        गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील महाफुड ही वेबसाईट बंद असल्याने शिधापत्रिके संबंधित सर्व ऑनलाईन कामे बंद आहेत. त्याच्या राज्यभरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विभागातून नाव वाढवणे, नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, आधार संबंधित कामे, नवीन शिधापत्रिका देणे, शासकीय विभागातून वैद्यकीय उपचारासाठी पुरवठा विभागातून लागणारी लागणारे दाखले ही मिळत नसल्याने आरोग्य संबंधित योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागातील ही सर्वच कामे ठप्प असल्याने सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.  

        काही काळासाठी वेबसाईट चालू असते, मात्र पुन्हा बंद होत असल्याने काहीजणांची कामे अर्ध्यात खोळंबतात. लोक आपल्या शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात पण सर्वर समस्या येत असल्याने काम पूर्ण न झाल्याने पुन्हा सात-आठ दिवसांनी या असे कर्मचारी सांगतात. पुन्हा आले तरी हीच समस्या उद्भवत असल्याचे करणे सामोरे देतात. नागरिकांनी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता वेबसाईट अद्याप चालू नसल्याचे सांगण्यात येते. अशीच कारणे देत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चक्क पाच वर्षांपूर्वी कोरोना काळात बनलेले रेशनकार्ड धारकाला अजूनही राशन मिळत नसल्याने आता हे राशनकार्ड शोभेची वस्तू बनलेले आहे.

        वेबसाईट बंदची कारणे देत समस्या निवारणासाठी प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. ''सर्वर डाऊन'' असल्याने आम्ही काय करणार? असे सांगत कर्मचारी वेळ मारून नेत आहे. एकाच कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना अनेक हेलपाटे घालावे लागत आहेत. ही अडचण लवकर दूर करून नागरिकांना नाहक होणारा त्रास मोदीदेवेंद्र सरकारने कमी करावा अशी मागणी नागरिक करीत आहे. 

#FoodandCivilSuppliesDepartment #mahafood #website #cm #devendrafadanvis #rationcard #pmmodi #chandrapur #rajura #tahasilofficerajura #tahasildar #collector

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top