Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नव वर्षाची सुरुवात रक्तदान करून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नव वर्षाची सुरुवात रक्तदान करून दहा वर्षांपासून मनोज तेलीवार ठरतोय पहिला रक्तदाता आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 01 जानेवारी 2025) -  ...
नव वर्षाची सुरुवात रक्तदान करून
दहा वर्षांपासून मनोज तेलीवार ठरतोय पहिला रक्तदाता
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 01 जानेवारी 2025) -
        ऐरवी नविन वर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाला निरोप देताना मस्त पैकी पार्टी, जेवणाचा बेत आणि मौजमस्ती असा काहीसा आनंदोत्सव साजरा करतांना अनेकांना बघतो. परंतु या सर्व मौजमस्ती ला बगल देत मनोज प्रकाश तेलीवार, राजुरा तालुका संघटक, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा पदाधिकारी तथा सामजिक कार्यकर्ता यांनी वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी पहिला रक्तदाता म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल दहा वर्षांपासून नियमितपणे रक्तदान करून नववर्षाच्या शुभेच्छ दिल्या. यावर्षीपण त्याने पहिला रक्तदात्याचा मान कायम राखला आहे. मागील वर्षी २०२४ मधे तब्बल पंधरा हजार तीनशे पासष्ट रक्तदाते चा पल्ला गाठून चंद्रपूर जिल्ह्यने महाराष्ट्रातून पहिले स्थान पटकावले होते. यावर्षी सुद्धा विक्रमी रक्तदान होईल असा विश्वास मनोज तेलीवार याने व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. मिलींद झाडे, डॉ. निधी पूनिया, तंत्रज्ञ प्रतीक मोटे, पंकज पवार आदींची उपस्थिती होती. मनोज तेलीवार यांच्या कार्याबद्दल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, सचिव सचिन वाघ, आशिया रिझवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, महीला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, सहसचिव संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मोहनदास मेश्राम, राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, शहर अध्यक्ष श्रीरंग ढोबळे आदींनी कौतुक करीत त्यांच्या रक्तदान कार्याबद्द्ल अभिनंदन केले.
#Raktdan #manojteliwar #aamchavidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top