आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपुर (दि. ०२ जानेवारी २०२४) -
व्हाईस ऑफ मिडीया (voice of media) साप्ताहिक विंग चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदासाठीची निवडणूक 2024-25 ची प्रक्रिया लोकशाही पद्धतिने नुकतीच (Chandrapur District Central Cooperative Bank) चंद्रपुर जिला मध्यवर्ती सहकारी बैंक, चंद्रपुर च्या सभागार मध्ये पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये चंद्रपुर जिला साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदासाठी लोकतंत्र की आवाज वृत्तपत्राचे संपादक जितेन्द्र (राजू) जोगड़ यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी विदर्भ विभागीय अध्यक्ष किशोर कारंजेकर व वर्धा जिलाध्यक्ष नरेंद्र देशमुख यांनी जितेन्द्र (राजू) जोगड़ यांना चंद्रपुर जिला साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष पदी बिनविरोध निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, प्रदेश उपाध्यक्ष संजय पडोले, अनिल बालसराफ, जितेन्द्र चोरड़िया, गुरु गुरुनूले, अनिल पाटिल, श्रीहरि सातपुते, दीपक शर्मा, अनंता गोखरे, कृष्णा गेडाम, आशीष रैंच, धनराज सिंह शेखावत, वीर पुणेकर, भैरव दिवसे, मनोजकुमार कनकम, विजय सिद्धावार, भोजराज गोवर्धन, रमेश महूरपवार, शंकर महाकाली, चेतन लूतडे, राजेश रेवते, सारथी ठाकुर व चंद्रपुर जिला साप्ताहिक विंगचे अरुण वासलवार, सुरेश डांगे, गणेश रहीकवार, मनोहर दोतपल्ली, नरेश निकूरे, विठ्ठल आवले, विनोद बोदेले, रामकुमार चिचपालें, सुयोग डांगे यांच्यासह चंद्रपुर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
#voiceofmedia #loktantrakiaawaj #jitendrajogad #aamchavidarbha #vidarbha #chandrapur #maharashtra
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.