Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिल्हा परिषद हायस्कुल येथे विविध स्पर्धेसह सावित्रीबाईं फुले जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हा परिषद हायस्कुल येथे विविध स्पर्धेसह सावित्रीबाईं फुले जयंती साजरी  आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले, प्रतिनिधी राजुरा (दि. 03 जानेवार...
जिल्हा परिषद हायस्कुल येथे विविध स्पर्धेसह सावित्रीबाईं फुले जयंती साजरी 
आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले, प्रतिनिधी
राजुरा (दि. 03 जानेवारी 2024) -
        जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा (Zilla Parishad High School Rajura) येथे सावित्रीबाई फुले जयंती (Savitribai Phule Jayanti) साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, नाटिका आदी कलागुण प्रस्तुत केले (Various competitions, plays). सर्वप्रथम सावित्रीबाईं फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करत मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक किशोर उईके, शिक्षक सतीश शेंडे, शिक्षिका संगीता घोडेस्वार, रत्नमाला खनके, डॉ. अफरोज बेग उपस्थित होते. 

        सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका, गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा प्रस्तुत केली (Singing, Elocution Competition).  उत्कृष्ठ ठरलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात आले. संचालन विद्यार्थी कामाक्षी सहारे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षिका लता मडावी यांनी तर आभार विद्यार्थी सलोनी चहारे यांनी केले. कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (जिल्हा परिषद हायस्कुल राजुरा)

#ZillaParishadHighSchoolRajura #SavitribaiPhuleJayanti #Students #teachers #Variouscompetitions #plays #Singing #ElocutionCompetition #Teachingstaff #nonteachingstaff #students

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top