Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री गुरु गोबिंद सिंह जयंती निमित्त विरूरवासियांनी राबविले स्वच्छता अभियान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री गुरु गोबिंद सिंह जयंती निमित्त विरूरवासियांनी राबविले स्वच्छता अभियान आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरूर स्टेशन (दि. ०४ जानेवारी २०२४) ...
श्री गुरु गोबिंद सिंह जयंती निमित्त विरूरवासियांनी राबविले स्वच्छता अभियान
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. ०४ जानेवारी २०२४) -
        श्री गुरु गोबिंद सिंह यांच्या जयंती (Shri Guru Govind Sinh Jayanti) निमित्य औचित्य साधून विरूर येथे संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाचे आयोजन (wirur walking club) विरूर वॉकिंग क्लब आणि गुरुद्वारा सिंग सभा (Gurdwara Singh Sabha) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सकाळी ६ वाजता (gurdwara) गुरुद्वारा विरूर स्टेशन येथे सर्व सदस्य जमा झाले आणि अभियानाला सुरुवात केली.

        अभियानाची सुरुवात गुरुद्वारा परिसर स्वच्छ करण्यापासून झाली. त्यानंतर विरूर येथील मुख्य मार्ग, श्री छत्रपती शिवाजी चौक, बालाजी चौक,  हनुमान मंदिर परिसर, सिंधी मार्ग, रमाई बुद्ध विहार परिसर, संत तुकडोजी महाराज चौक आणि आठवडी बाजार चौक स्वच्छ करण्यात आले. गावातील स्वच्छतेच्या संदर्भात व आपल्या आरोग्याविषयी अनिल आलाम सरपंच विरूर स्टेशन, अजय रेडी, प्रदीप पाला, आणि प्रवीण चिडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अविनाश रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित सिंग यांनी मानले.

        या स्वच्छता अभियानाने गावात सकारात्मक संदेश पसरवला आणि सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता अभियानात अजय रेड्डी, अविनाश रामटेके, प्रदीप पाला, उमेश मोरे, ज्ञानेश्वर तुरणकार, राकेश रामटेके, प्रदीप देठे, देविदास खोबरे, संदीप ठमके, प्रवीण चिडे, गजानन ढवस, बंडू झाडे, नामदेव चिडे, शंकर गोहणे, ज्ञानेश्वर मोरे, उपसरपंच प्रीती पवार, सरिता रेड्डी, आशा चांदेकर, मयुरी वानखेडे, अनुराधा चिडे, निलीमा पावडे, प्रियंका रामटेके, तीर्थ कौर टाक व सुनंदा मोरे यांनी परिश्रम घेतले.

#gurugovindsinhjayanti #wirurstation #sachtaabhiyan #village #wirurwalkingclub #gurdwarasinghsabha #gurudwara #wirurstation
04 Jan 2025

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top