Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले, प्रतिनिधी राजुरा (दि. 03 जानेवारी 2024) -         नरेंद्राचार्य महार...
राजुरा येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन
आमचा विदर्भ - निशा महेश मोहुर्ले, प्रतिनिधी
राजुरा (दि. 03 जानेवारी 2024) -
        नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या (Narendracharya Maharaj Sansthan) वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 4 जानेवारी ते दिनांक 19 जानेवारी 2025 दरम्यान (Blood donation camp) "रक्तदान महायज्ञाचे" आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक 05 जानेवारी 2025 ला राजुरा येथील (Upazila Hospital Rajura) उपजिल्हा रुग्णालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

        आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल, ॲनिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त प्रमाणात आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताचे नितांत आवश्यकता असते, यासाठी (Government of Maharashtra) महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाॅटल देण्याचे या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.

        आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिट रक्तदानासाठी आवश्यक आहेत. तरी आपल्या व्यस्त दिनचर्यातून समाजासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून रविवार, दिनांक 5 जानेवारी 2025 ला राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 8:30 ते 3 यावेळेस येऊन सामाजिक कार्यास सहभागी होऊन उपकृत करावे, (swa swarup sampraday seva samiti rajura) असे आवाहन स्व-स्वरूप संप्रदाय सेवा समिती, राजुरा तर्फे करण्यात आले आहे. (Sickle cell, anemia, hemophilia, blood cancer, kidney failure patients)

#Blooddonationcamp #NarendracharyaMaharajSansthan #upazilahospitalrajura #Sicklecell #anemia #hemophilia #bloodcancer #kidneyfailure #patients #doctors #GovernmentofMaharashtra #swaswarupsampradaysevasamitirajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top