Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नवीन वर्षाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आवश्यक - डॉ.कल्पना गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नवीन वर्षाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आवश्यक - डॉ.कल्पना गुलवाडे आरुशी फाऊंडेशनच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत ज्येष्ठ  नागरि...
नवीन वर्षाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आवश्यक - डॉ.कल्पना गुलवाडे
आरुशी फाऊंडेशनच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत ज्येष्ठ  नागरिकांसोबत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 01 जानेवारी 2025) -
       (Arushi Foundation) आरुशी फाऊंडेशनच्या वतीने (Welcome to the new year) नवीन वर्षाचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. फाऊंडेशनने (Debu Sawli Old Age Home) डेबु सावली वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांसोबत नवीन वर्षाचा प्रारंभ साजरा केला. त्यांना सदैव उपयोगात येणारा फ्रिज चे वितरन करून येणाऱ्या वर्षाच्या सुरुवातीचे दिवस सुदृढ व सशक्त जावे म्हणून सुकामेव्याचे वितरण करण्यात आले.
        या प्रसंगी जेष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, आणि आपुलकीने भरलेली संवादाची पर्वणी होती. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आरुषी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. कल्पना गुलवाडे यांनी नवीन वर्षाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुणे म्हणून आरुषी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कल्पना गुलवाडे, सचिव  डॉ. प्राजक्ता अस्वार, संस्थापकीय अध्यक्षा डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. रुजुता मुंदडा, डॉ. नरेंद्र कोलते, गायत्री देशमुख आणि डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आपली उपस्थिती नोंदवली.
           
        कार्यक्रमाच्या वेळी जेष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या गरजांबाबत चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता आणि सकारात्मकता नक्कीच वाढेल, असे मत व्यक्त केले. आरुशी फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जेष्ठ नागरिकांना नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात करता आली. फाऊंडेशनने यापुढेही अशा सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (aamcha vidarbha)

#DrKalpanaGulwade #DrMangeshGulwade #ArushiFoundation #DebuSawliOldAgeHome #Welcometothenewyear2025

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top