Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात! आमचा विदर्भ - दीपक शर्मा ...
तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात
आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग जोरात!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गोंडपिपरी (दि. 01 जानेवारी 2025) -
        गोंडपिपरी (Gondpipari) तालुका (Congress) काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार (Nilesh Sangamwar) यांनी आज राजुरा येथील भाजपा विधानसभा जनसंपर्क कार्यालयात आमदार देवराव भोंगळे (MLA Devrao Bhongle) यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) प्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांचे गळात पक्षाचा दुपट्टा टाकून भाजपात स्वागत केले.

       राजुरा विधानसभेचा निकाल हा ऐतिहासिक असाच ठरला. देवराव भोंगळे हे तिसऱ्या क्रमांकावर राहतील अशी भाकीत मांडणाऱ्या राजकीय पंडीतांचे सर्व दावे चुकीचे ठरवत भाजपचे देवराव भोंगळे निवडून आले. थेट जनसंपर्क, गोरगरीबांच्या सेवेला धावून जाण्याची आत्मियता आणि प्रभावी प्रचारयंत्रणा हे भोंगळेंच्या विजयासाठी जमेची बाजु ठरले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केले. 

        निवडणुकीच्या प्रचारपुर्व काळापासूनच देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तरूणांची भाजपला पसंती दिसून येत होती. भोंगळे आमदार झाल्यानंतर राजुरा विधानसभेत पक्षप्रवेशाचा वेग वाढला असून आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वात विधानसभेत दररोज प्रवेश होत आहेत. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता भाजपात जोरदार इनकमिंग होत असल्याची नागरीकांमध्ये चर्चा आहे.
▪️ कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध - डॉ.मंगेश गुलवाडे
        पुर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले संगमवार हे मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमध्ये गेले होते. परंतू देवराव भोंगळे निवडून येताच 'विकासाचा वादा, देवराव दादा' म्हणत ते पुन्हा भाजपवासी झाले. यावेळी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका महामंत्री निलेश पुलगमकर, जेष्ठ नेते दिपक बोनगिरवार, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, भाजयुमोचे महामंत्री व बाजार समितीचे उपसभापती स्वप्नील अनमूलवार, साईनाथ मास्टे, सुहास माडूरवार, सुरेश धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

#Gondpipari #Congress #NileshSangamwar #BharatiyaJanataParty #MLA #DevraoBhongle #RajuraAssembly

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top