Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध - डॉ.मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध - डॉ.मंगेश गुलवाडे इंडियन रेड क्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या ...
कामगारांच्या सुदृढ आरोग्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी कटिबद्ध - डॉ.मंगेश गुलवाडे
इंडियन रेड क्रॉस सोसायटी व टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व सीपीआर प्रशिक्षण शिबीर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 01 जानेवारी 2025) -
        इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर (Indian Red Cross Society Chandrapur and Tata Cancer Care Foundation Chandrapur) यांच्या संयुक्त विद्यमाने (worker) नव नियुक्त कामगारांच्या आरोग्य तपासणीसह रुग्णांच्या हृदयरोगाशी संबंधित आजारांविषयी जागृती व सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या विशेष शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन डॉ.प्रदीप वर्घने (कार्डियोलॉजिस्ट), डॉ. आशिष बारब्दे आणि पियूष मेश्राम यांनी केले. शिबिरामध्ये नव नियुक्त कामगारांचे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासोबतच (heart disease) हृदयरोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि त्वरित उपचार पद्धती याबाबत सखोल माहिती देण्यात आली. सीपीआर प्रशिक्षणाद्वारे जीवन वाचवण्यासाठी त्वरित उपाययोजनांची सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. (Health screening and CPR training camp)
        हा कार्यक्रम कामगारांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. इंडियन रेड क्रॉस सोसायटीटाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सौरभ राजूरकर, डॉ.ट्विंकल डेंगळे, डॉ.ज्योती मुरमाडकर, डॉ. देवाशिष घुमे,सेफ्टी ऑफिसर गुणवंत व कुणाल लोखंडे, सुभाष मुरस्कर, आरिफ काझी यांनी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha)

#IndianRedCrossSociety #TataCancerCareFoundation #Chandrapur #Vidarbha #Mahrashtra #aamchavidarbha #rajura #DrMangeshGulwade #Healthscreening #CPRtrainingcamp #worker #heartdisease

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top