नंदीगोटा नाल्यावरून रेतीची तस्करी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 18 डिसेंबर 2024) -
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव नियतवन क्षेत्रातील नंदीगोटा नाल्यातील रेती उपसा करून रेती तस्करी करीत असताना वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर (tractor) सह आरोपीस ताब्यात घेऊन वन गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि.17) करण्यात आली. वनक्षेत्रात नियमित गस्त करीत असताना करण्यात आली. (Rajura Forest Range)
वन कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, नंदीगोटा नाल्यावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी (Sand smuggling) होत आहे. माहिती मिळताच ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 5194 हा ट्रॅक्टर जप्त करीत, एका आरोपीस वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन विहिरगाव वन कार्यालयात आणून वनगुन्हा दाखल केला. सदर ट्रॅक्टर मंगेश आस्वले यांचे असल्याचे समजते. ही करवाई क्षेत्र सहायक एम.एन. निर्बुद्धे, वनरक्षक संजय सुरवसे, वनमजुर प्रवीण गोहणे, सुधाकर गेडाम यांनी केली असून (Forest Range Officer) वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांचे मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे.
#RetiTaskari #SandSmuggling #Vihirgaon #Rajura #Chandrapur #VanVibhag #VanVibhagRajura #RajuraForestRange #tractor #NandigotaDrain #forestcrime #ForestRangeOfficer
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.