Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिकलसेल परीक्षण व मार्गदर्शन शिविर संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सिकलसेल परीक्षण व मार्गदर्शन शिविर संपन्न 150 विद्यार्थ्यांतून 6 विद्यार्थी पॉजिटीव्ह आढळले जेसीआय राजुरा रॉयलच्या स्तुत्य उपक्रम  आमचा विदर...
सिकलसेल परीक्षण व मार्गदर्शन शिविर संपन्न
150 विद्यार्थ्यांतून 6 विद्यार्थी पॉजिटीव्ह आढळले
जेसीआय राजुरा रॉयलच्या स्तुत्य उपक्रम 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १९ डिसेंबर २०२४) -
        स्थानिक डॉ. झाकीर हुसेन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस नगर परिषद प्राथमिक शाळेत जेसीआय राजुरा रॉयलच्या वतीने सिकलसेल परीक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. (Sickle cell testing and guidance camp) स्थानिक उपजिल्हा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक जाधव तसेच परिचारिका शुभांगी पुराटकर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शिबिरात वैद्यकीय सेवा देत कर्तव्य बजावले. (Upazila Hospital Medical Officer Dr. Ashok Jadhav)

        शिविरामध्ये 150 विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये 6 विद्यार्थ्यांना सिकलसेलच्या आजाराचे पॉझिटिव्ह परिणाम आढळले आहेत. या परीक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या (Health awareness) आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यास मदत झाली आहे. सिकलसेल रोगाबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या आजाराच्या प्रतिबंधांबाबत आवश्यक माहिती मिळाली. (JCI Rajura Royal) जेसीआय राजुरा रॉयलच्या  या उपक्रमामुळे सिकलसेल रोगाविषयी लोकांमध्ये अधिक जागरूकता येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. (Students)

        जेसीआय राजुरा रॉयलच्या स्वरुपा झंवर (Swarupa Zhanwar) यांनी आपल्या भाषणात म्हटले की, (Health camp) "आरोग्यविषयक शिबिर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. JCI च्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिराला ह्या शाळेत साकार करण्याचा निर्णय घेतला. JCI च्या माध्यमातून समाज कार्य करणे हा माझा प्रयत्न असतो." या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व ज्ञान मिळेल, जे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करेल. JCI च्या उपक्रमांमुळे समाजातील बदल घडवण्यासाठी प्रेरणा मिळते, हे देखील त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

        संचालन निवेदिता पातुरकर तसेच आभार मंजूषा येरणे यांनी केले. शिबिराचा यशस्वितेकरिता पूजा बानकर, संतोषी आत्राम, जयश्री शेंडे, राधिका धनपावडे, अनुष्का रैच, शुभांगी वाटेकर, नम्रता खोंड, श्वेता अपराजित, पूजा घरोटे यांनी परिश्रम घेतले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

JCI राजुरा रॉयल वर्षभर राबवते असते स्तुत्य उपक्रम 
         जेसीआय राजुरा रॉयलच्या अनेक स्तुत्य उपक्रमांमध्ये सामुदायिक सेवा, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, आरोग्य शिबिरे आणि युवक विकास कार्यक्रम यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे स्थानिक लोकांना मदत करण्याचा आणि त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. (A commendable undertaking)
  • शिक्षण आणि ज्ञानविस्तार: जेसीआय राजुरा रॉयल विद्यार्थ्यांसाठी शालेय उपक्रम, कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवतात.
  • आरोग्य शिबिरे: आरोग्यबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मोफत आरोग्य तपासणीसाठी शिबिरे आयोजित करणे.
  • पर्यावरण संरक्षण: वृक्षारोपण मोहीम, प्लास्टिक समाप्ती सारखे उपक्रम आयोजित करण्यात येतात.
  • सामुदायिक सेवा: गरजूंना मदत करण्यासाठी अन्न, कपडे, आणि इतर मूलभूत वस्तूंचे वितरण.
  • युवक विकास: युवांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि उपक्रम.
        या सर्व उपक्रमांद्वारे, जेसीआय राजुरा रॉयल स्थानिक समाजाच्या उत्कर्षासाठी कार्यरत असून अश्या प्रकारचे उपक्रमांचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता जेसीआय राजुरा रॉयलचे कार्य प्रशंसनीय ठरत आहे.

#Sicklecell #UpazilaHospital #MedicalOfficer #DrAshokJadhav #JCIRajuraRoyal #Healthawareness #Healthcamp #Students #Acommendableundertaking #SwarupaZhanwar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top