आ. भोंगळे यांनी केली मागणी
मागणी करताना नवनिर्वाचित आमदाराला जिवती व विरूर स्टेशन चा पडला विसर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० डिसेंबर २०२४-
औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदुर व कोरपना (Gadchandur & Korpana) या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही बसस्थानक (bus station) नसल्याने येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील (Rajura Assembly Constituency) गडचांदूर व कोरपना या दोन शहरांची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजाराच्या आसपास असून अद्याप बसस्थानक नसल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रवास करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडीअडचणी निर्माण होत आहेत. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता (MLA Devrao Bhongle) आमदार देवराव भोंगळे यांनी गडचांदुर व कोरपना येथे नविन बसस्थानक निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मात्र आ. भोंगळे हे अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुका व राजुरा विधानसभा क्षेत्रात सावत्र वागणूक मिळणाऱ्या विरूर स्टेशन चा आमदार भोंगळे याना विसर पडला असल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल येथील लोकांत नाराजी दिसून येत आहे. जिवती व विरूर स्टेशन ला स्वातंत्र्य मिळायला ७५ वर्षे झाली नाही आहे का? असा टोला हि लोकांनी लगावला आहे.
गडचांदुर व कोरपना दोन्ही शहर (930 D National Highway) ९३० डी या राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहरे असून याठिकाणी बसस्थानक होणे अत्यंत गरजेचे होते, परंतु अद्यापपर्यंतही या दोन्ही ठिकाणी नवीन बस स्थानक करण्याबाबत कार्यवाहीमध्ये दिरंगाई होत आहे. ही बाब आमदार देवराव भोंगळे यांच्या निदर्शनास आली. गडचांदूर येथील नवीन बसस्थानक (New bus station) करणेबाबत जिल्हा प्रशासनाने रीतसर प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला असून कोरपनाच्या बसस्थाकाकरीता अद्याप भु-संपादन (land acquisition) होणे बाकी आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हा-पावसासह धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी नागरिकांना प्रवास करण्यामध्ये सोयीचे होईल या उद्देशाने तातडीने नवीन बसस्थानकास भूसंपादनासह मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री यांनी परिवहन विभाग (Department of Transport) यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.