राजुरा तालुक्यातील प्रकार, तरुणाला अटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 18 डिसेंबर 2024) -
राजुरा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Abuse of a minor girl) केल्याप्रकरणी, गावातीलच 23 वर्षे तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे (Youth arrested). त्याच्या विरुद्ध पास्को आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे (Filed a case). दरम्यान या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला (Child born).
गावातील एका 23 वर्षीय युवकाकडे गावातील इयत्ता 8 वी शिकणारी 13 वर्षीय मुलगी शिकवणीसाठी येत होती. हा युवक तिला मोफत शिकवित असे. या दरम्यान त्याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दोन दिवसापूर्वी या मुलीची तब्येत चांगली वाटत नसल्याने, तिला चंद्रपूर (Chandrapur) येथील खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले (Private Hospital), तेव्हा सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आले (Sonography). याविषयी (Doctor) डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. (Rajura Police Station) राजुरा पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन आणि मुलीचे बयान घेऊन आरोपींविरुद्ध कलम 376 (3), 376 (2), एन पोक्सो अंतर्गत (Filed a case) गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. दरम्यान या अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. सध्या त्याला संगोपन गृहात ठेवण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निशा भुते करीत आहेत. (Rajura) (Aamcha Vidarbha) (Assistant Inspector of Police)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.