Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत नाताळ व आनंद मेळाव्याचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत नाताळ व आनंद मेळाव्याचे आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा   राजुरा (दि. ३० डिसेंबर २०२४) -         दिनांक २३ डिसेंबर, सो...
ऑर्किड इंटरनॅशनल शाळेत नाताळ व आनंद मेळाव्याचे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  
राजुरा (दि. ३० डिसेंबर २०२४) -
        दिनांक २३ डिसेंबर, सोमवार रोजी (Orchid International School Rajura) ऑर्किड इंटरनॅशनल शाळेमध्ये (christmas) नाताळ व आनंद मेळाव्याचे (aanand melava) आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पदार्थाचे स्टॉल लावले, ज्यामुळे उपस्थितांनी चविष्ट विविधता अनुभवली. (A variety of food stalls)

        आनंद मेळावा या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैशाची देवाण-घेवाण कशी करायची याचे ज्ञान देखील देण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय स्थानावर सौ. संध्या चिल्लावर यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मार्गदर्शन केले. 

    ऑर्किड इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक समीर चिल्लावार यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत व्यवसायिकता आणि वित्तीय ज्ञानाची महत्त्वाची माहिती दिली. 

        कार्यक्रमात ऑर्किड इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा खोब्रागडे मॅम व किडजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनाली गूनटिवार मॅम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नेहा शेख यांनी तर आभार सौ. अनिता बोरकुटे मॅम यांनी केले. नाताळाच्या पार्श्वभूमीवर साजरा केलेला हा आनंद मेळावा विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायक ठरला. 

#Rajura #Chandrapur #Vidarbha #Maharashtra #News #breakingnews #aamchavidarbha #OrchidInternationalSchool #christmas #anandmelava #Students #Avarietyoffoodstalls #SameerChillawar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top