Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या महिलेच्या कुटुंबांना आमदार भोंगळे यांची सांत्वना भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या महिलेच्या कुटुंबांना आमदार भोंगळे यांची सांत्वना भेट लक्कडकोट शेत शिवारात पट्टेदार वाघाची दहशत कायम.... आम...
वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या महिलेच्या कुटुंबांना आमदार भोंगळे यांची सांत्वना भेट
लक्कडकोट शेत शिवारात पट्टेदार वाघाची दहशत कायम....
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी 
विरूर स्टेशन (दि. २४ डिसेंबर २०२४) -
       काल (दि. २३) सायंकाळच्या सुमारास विरूर स्टेशन वनपरीक्षेत्रातील कविटपेठ येथील लाळुबाई अर्जुन आत्रामवय 60 वर्ष यांचेवर शेतात काम करीत असतांना नरभक्षी वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची दुर्घटना घडली; या घटनेनंतर कविटपेठ येथे (MLA Devrao Bhongle) आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन आत्राम कुटुंबीयांचे सांत्वन केले.

        ही दुर्घटना अतिशय दुःखद असून धक्कादायक अशीच आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा केली. भयग्रस्त नागरीकांच्या समस्या ऐकून घेत या नरभक्षी वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागलीच केली. यावेळी भाजपचे तालुका महामंत्री बाळनाथ वडस्कर, तालुका उपाध्यक्ष सतिश कोमरवेल्लीवार व तालुका सचिव प्रदीप पाला, शंकर धनवलकर, सत्यपाल दुर्गे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

लक्कडकोट शेत शिवारात पट्टे दार वाघाची दहशत कायम....
        आज सकाळी 10 वाजता च्या दरम्यान शेतात कापुस वेचनी साठी गेलेल्या महिलांना वाघदिसल्याने गांव श्रेत्रात भीती आणि दहशती चे वातावरण निर्माण झाले आहे. या श्रेत्रात मागील एक महिन्यापासून सतत वाघाचे दर्शन आणि हल्ले सुरू आहे, परंतु वनविभाग कढून कोणत्या ही प्रकारची जनजागृती किंवा वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणतेही ठोस उपाय केले गेलेले नाही, यात वनविभागाची उदासीनता दिसून येत आहे, परिसरातील शेतकऱ्यांनी तसेच नागिकन सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

#tiger #tigerattack #WirurForestZone #Death #farmer #ForestDepartment #KoshthalaNiyatkshetra #PoliceStationWirur #Warningalert #aamchavidarbha #wirurstation #RTONE #RT1 #TigerRTone #kavitpeth #VatsalbaiArjunAtram #Womandiesintigerattack #MLA #DevraoBhongale #Lakkadkot #Shetshivar #consolation #Theterrorofthetigerremains

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top