Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बुधवारी डॉ मोहन भागवत चंद्रपूरात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बुधवारी डॉ मोहन भागवत चंद्रपूरात सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २३ डिसेंबर २०२४) -         ...
बुधवारी डॉ मोहन भागवत चंद्रपूरात
सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ डिसेंबर २०२४) -
        मागील 29 वर्षापासून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकी मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या (Sanmitra Sainiki Vidyalaya) सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव बुधवार दि. 25 डिसेंबर 2024 ला शाळेच्या परिसरात आयोजित होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून (Rashtriya Swayamsevak Sangh) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत (Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat) यांची तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ परमानंद अंदनकर (Dr. Parmanand Andankar), व सन्मित्र मंडळाचे सचिव अँड. निलेश चोरे (Adv. Nilesh Chore) यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती प्राचार्य अरुंधती कावडकर यांनी सैनिकी शाळा येथे सोमवारी (दि 23)दिली. शाळेच्या दैनंदिन शिक्षणातून दिल्या जाणाऱ्या सैनिकी प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी समदेशक कमांडर सुरींदरकुमार राणा, विद्यार्थी नायक भानुदास वाढणकर यांची उपस्थिती होती. (Aamcha Vidarbha) (Chandrapur)

#SanmitraSainikiVidyalaya #Anniversary #RashtriyaSwayamsevakSangh #SarsangchalakDrMohanBhagwat #DrParmanandAndankar #AdvNileshChore #aamchavidarbha #chandrapur

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top