Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरोही सुगम संगीत विद्यालयाने सर्व धर्म समभाव जोपासला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरोही सुगम संगीत विद्यालयाने सर्व धर्म समभाव जोपासला आकाशवाणी केंद्रावर 25 डिसेंबरला साजरीकरणाची संधी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २...
आरोही सुगम संगीत विद्यालयाने सर्व धर्म समभाव जोपासला
आकाशवाणी केंद्रावर 25 डिसेंबरला साजरीकरणाची संधी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ डिसेंबर २०२४) -
        ख्रिसमस निमित्त कॅरल गीत सादर करून सर्व धर्म समभावाची (Sarva Dharma Sambhav) भावना जोपासली, या केंद्राच्या मार्गदर्शिका व केंद्रप्रमुख अलका दिलीप सदावर्ते यांनी सर्व संगीत प्रेमी विद्यार्थ्यांना क्रिसमस गीतांचे प्रशिक्षण देऊन या गीतांना आकाशवाणी केंद्रावर 25 डिसेंबरला साजरीकरणाची संधी मिळाली आहे, वर्षभर चालणाऱ्या विविध उपक्रमात हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे (Aakashvani Kendra) आकाशवाणी केंद्रावर हा कॅरल गीताचा कार्यक्रम 25 डिसेंबरला सकाळी प्रसारित होणार असून यामध्ये मुख्य गायन व निवेदन अलका दिलीप सदावर्ते (Alka Dilip Sadavarte) यांनी केले आहे तसेच पेटी वादन कुमारी सोनिया बेलगिर, तबला वादन लखन कुळमेथे, सह गायन करुणा गावंडे, लता कुलमेथे, सुनिता टिपले, सुनिता टिपले, जयश्री मंगरूळकर, विना देशकर, रचना देवगडे, हर्षाली मोहुरले, सुनिता कुंभारे, अंजया कणकम, अनमोल बोरकर यांनी केले. तसेच या क्रिसमस गीता करिता स्वर प्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते (Dilip Sadavarte) यांनी संयोजन आयोजन करून कॅरल गीताच्या यशस्वी ते करिता मोलाचे सहकार्य केले तसेच वर्षभर विविध उपक्रम (Social and cultural events) सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून कलेचा विकास करण्याचे कार्य या संस्थेमार्फत होणार आहे. (Aamcha Vidarbha) (Chandrapur)

#aamchavidarbha #chandrapur #ArohiSugamSangeetVidyalaya #Allreligionsareequal #SarvaDharmaSambhav #Radiostation #aakashvaniKendra #AlkaDilipSadavarte #DilipSadavarte #Socialandculturalevents #Rajura


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top