Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकरी संघटना व दोन राष्ट्रीय पक्षांना कोण देत आहे आवाहन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
या निवडणुकीत हा ''पक्ष'' निभावत आहे महत्वाची भूमिका आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२४) -         राजुरा...
या निवडणुकीत हा ''पक्ष'' निभावत आहे महत्वाची भूमिका
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२४) -
        राजुरा विधानसभा निवडणुकीच्या मतदानचे दिवस जसे जसे जवळ येत आहे तसे तसे राजकीय पक्षानी आपल्या प्रचाराचा वेग वाढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत विधानसभा मध्ये वरवर पाहता तिरंगी लढत प्रसार माध्यम सांगत असले तरी वस्तुस्थितीत हि चौरंगी लढत असल्याचे दिसून येत आहे. कारण या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ने सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे याना उमेदवारी दिली आहे. मागील तीन वर्षात भूषण फुसे यांनी चांगला जनसंपर्क तयार केल्याने चौरंगी लढाईचे चित्र निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकरी संघटनेचे नेते स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अँड. वामनराव चटप हे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारास तगडे आव्हान देत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच इतर उमेदवारांचे भूमिका निर्णायक ठरणार अशी चर्चा सुरू आहे.

        राजुरा विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा गड म्हणून ओळखले जाते या गडाला शेतकरी संघटनेचे अँड. वामनराव चटप यांनी सन 1990, 1995 आणि 2004 मध्ये या गडाला सुरुंग लावले. मागील 2019 मध्ये काँग्रेस आणि शेतकरी संघटना मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्या निवडणुकीत काँग्रेस अवघ्या दोन हजाराचा फरकाने शेतकरी संघटनेच्या अँड.वामनराव चटप यांचा पराभव केला. मात्र त्या निवडणुकीत अँड.वामनराव चटप यांना 57727  मत प्राप्त झाले. विशेष बाब अशी की, अँड.वामनराव चटप हे मागील दोन आमदारकीचे निवडणूक उभे नव्हते. मागील 10 वर्षांच्या गॅप असून देखील ते दुसऱ्या क्रमांकावर होते तर राष्ट्रीय पक्ष भाजप यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील भाजप मागील निवडणुकीत तिसऱ्या नंबरवर राहिले. आणि या निवडणुकीत भाजपा चौथ्या नंबरवर जाण्याचे भाकीत केले जात आहे.

        सध्या विधानसभेत शेतकरी संघटना, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि भाजप मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. तर मुख्य लढत काँग्रेस आणि शेतकरी संघटना मध्ये राहणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे. भाजप मध्ये स्वपक्षीय नेते मंडळी यांच्या नाराजीमुळे तसेच कार्यकर्त्यांचे नाराजी मुळे सध्या तरी बॅकफूटवर दिसून येत आहे असे चर्चा सुरू आहे. मात्र राजकारणात कधी काय चमत्कार घडेल याच नेम नाही. त्यामुळे कोणाला कमजोर म्हणून राजकारणात चालणे हे भविष्यात धोकादायक असते. आजच्या घडीला शेतकरी संघटना दोन राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस यांना तगडे आवाहन देत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण मागील पाच वर्षांपासून अँड.वामनराव चटप हे जनतेच्या संपर्कात होते अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. 

        एकीकडे सुभाष धोटे समर्थक हे यावेळी आमची मुख्य लढत भाजप सोबत असल्याचे सांगत आहे. तर भाजप सुद्धा आमची लढत काँग्रेस सोबत आहे. असे सांगत असले तरी काँग्रेस पक्षाचे माज आलेले आगाऊ कार्यकर्त्यांमुळे सुभाष धोटे यांचे मत प्रतिशत कमी होण्याची स्पष्ट चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहे. ह्याचा फटका सुभाष धोटे याना पडणार आहे. 

        मागील साढे तीन वर्षात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी सुद्धा स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले असून तोडफोड व प्रहार स्टाईल आंदोलनाने युवक, कामगार, महिलावर्ग त्यांच्येशी जुडला गेला आहे. नागरिकांना वेठीस धंरणारे माज आलेले अधिकारी कर्मचारी ''लाता बुक्यांचा चोप खाल्ल्याशिवाय मानत नाही'' अशे फुसे यांचे धोरण असून त्यांच्या या धोरणाने युवक व असंगठित क्षेत्रातील कामगार यांच्याशी जुडला गेल्याने विविध कामगार संघटनेनी सुद्धा फुसे याना जाहीर समर्थन दिले आहे. सामाजिक कार्यात भूषण फुसे यांचे कार्य बघता संभाजी ब्रिगेडने फुसे याना उमेदवारी दिली आहे. नुकतीच गडचांदूर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांच्या मंचावर सुरज ठाकरे व डॉ. संजय लोहे यांनी सहभाग दर्शवून भाषण दिले होते. २००९ च्या निवडणुकीत सुरज ठाकरे याना जवळपास १० हजार तर डॉ. संजय लोहे याना जवळपास १२ हजार ५०० मते मिळाली होती. आता दोघांनी भूषण फुसे याना समर्थन दिल्याने भूषण फुसे यांची शक्ती वाढली आहे. 

        महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची भूमिका सुद्धा निर्णायक राहणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे. विशेष शेतकरी संघटना सध्यातरी दोन राष्ट्रीय पक्षाना तगडे आवाहन देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
#RajuraAssemblyElections2024 #Congress #BJP #ShetkariSanghtna #SambhajiBriged  #SocialWorker #BhushanFuse #Subhash Dhote #AdvWamanraoChatap #DeoravBhongale #Afourwaybattle

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top