आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. १२ नोव्हेंबर २०२४) -
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांचे निवडणूक प्रचार बॅनर जिवती शहरात अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना उघडकीस आली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती शहरात रस्त्यावर निवडणूक प्रचाराचे अधिकृत बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर कोणीतरी अज्ञात इसमाने फाडल्याची बाब उजेडात आली. याबाबत संभाजी ब्रिगेडचे उमदेवार भूषण फुसे यांच्या कार्यकर्त्यांकडून तक्रार करण्यात येणार असून भारतीय न्याय दंड संहिता आणि निवडणूक कायद्याअंतर्गत आदर्श आचार सहिंतेचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे. बॅनर फाडाफाडीमुळे निवडणुकीच्या काळात शांतता बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॅनर फाडाफाडीमुळे विरोधकांची विकृत मानसिकता लक्षात येते. विरोधक हे समोरच्या उमेदवाराची बरोबरी करू शकत नसल्यामुळे असले कृत्य करीत आहे. असा हल्लाबोल भूषण फुसे यांनी केला आहे. यापूर्वी स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवाराचे बॅनरची सुद्धा विटंबना गडचांदूरात करण्यात आली होती हे येथे विशेष. नेमकी बॅनर फाडणारे व विटंबना करणारे कोण यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे.
#MaharashtraAssemblyElection2024 #GhusadiMahotsav #Shankhnad #Navchetna #Aadiwasi #Gond #Samuday #Nrutyakala #SocialWorker #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SambhajiBrigedPaksha #Congress #BJP #ShetkariSanghtna #RokhthokPraharKamgarSanghtna #Thebannerwastorn #Election #RajuraAssemblyConstituency2024 #PoliceStationJiwati
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.