Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पब्लिक एप वर लावलेली ''ती'' बातमी ''त्या'' पत्रकाराला भोवणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माहिती व प्रसारण मंत्रालयात तक्रार भूषण फुसे ठोकणार पाच कोटींचा दावा कोरपना (दि. १६ नोव्हेंबर २०२४) -         सध्या विधानसभा निवडणुकीची धामध...
माहिती व प्रसारण मंत्रालयात तक्रार
भूषण फुसे ठोकणार पाच कोटींचा दावा
कोरपना (दि. १६ नोव्हेंबर २०२४) -
        सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. निवडणुकीत विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतात हे सर्वश्रुत आहे. आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे याकरिता निवडणूक आयोगाने नियमावली बनविली आहे. फेक न्यूज च्या माध्यमातून निवडणुकीत चुकीची बदनामीकारक बातमी पसरविणे, अफवा पसरवणे हा भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ५०५ नुसार अजामीनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्याखाली त्या व्यक्तीला तीन वर्ष कारावास आणि दंड शिक्षा होते, अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. मात्र पब्लिक एप वर एक चुकीची बातमी लावल्याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे उमदेवार व सामाजिक कार्यकर्ते हे कोरपण्यातील मनोज गोरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी व माहिती व प्रसारण मंत्रालयात तक्रार करणार असून पाच कोटींचा दावाही ठोकणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (Bhushan Fuse will stake a claim of five crores)

        मनोज गोरे यांनी पब्लिक एप वर दि. १५ नोव्हेंबर रोजी ''कोरपना: भूषण फुसे ची सभा ठरली कोरपण्यात फूस'' ह्या शीर्षकाखाली बातमी प्रकाशित केली. मनोज गोरे यांनी सभेच्या खाली खुर्च्या दाखवत फुसे हे मजुरांना चारशे रुपये तीनशे रुपये देऊन मजूर मुले लावून आपला प्रचार करीत आहे, या मध्ये मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग पैसा कमवीत आहे असा दावा केला. या बातमीत त्यांनी जवळपास १० ते १२ सेकंदाची एकच क्लिप ६ ते ७ वेळा दाखवत प्रेक्षकांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. मनोज गोरे, फुसे ची सभा फुस झाल्याची खोटी माहिती पसरवीत आहे. 

        वास्तविक पाहता भूषण फुसे यांची सभा जिथे मंडप आणि खुर्च्या लागल्या आहे तिथेच होणार होती मात्र लाऊडस्पिकर लागले नसल्याने ऐनवेळी भूषण फुसे यांनी ती सभा तिथून हलवून १५ ते २० मीटर अंतरावर असलेल्या चौकात प्रचाराचे ऑटोतील माईक घेऊन कॉर्नर सभा घेतली. कोरपना बाजाराचा दिवस असल्याने या चौकात मोठी गर्दी होती. यावेळी शेकडो नागरिक उभ्याने सभा ऐकत होते. याचे व्हिडीओ सुद्धा भूषण फुसे यांनी प्रसार माध्यमांना पाठविले आहे. मनोज गोरे सुद्धा यावेळी कॉर्नर सभेत उपस्थित होते. मात्र त्यांनी भूषण फुसे यांची बदनामीकारक चुकीची माहिती देत लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भूषण फुसे यांनी लगावला आहे आणि मनोज गोरे यांच्यावर पाच कोटींचा दावाही ठोकणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

#CornerSabha #RajuraAssemblyElections2024 #Congress #BJP #ShetkariSanghtna #SambhajiBriged #SocialWorker #BhushanFuse #PublicApp #FakeNews #Patrkar #MinistryofInformationandBroadcasting #Korpana #Modelcodeofconduct #IndianPenalCode #Nonbailableoffence #ElectionAdjudicatingOfficer #Aclaimoffivecrores

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top