Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: खैरे कुणबी समाज बांधवांचा ॲड.वामनराव चटप यांना पाठिंबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडपिपरी येथील बैठकीत एकमुखी निर्णय आमचा विदर्भ - अनंता गोखरे गोंडपिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) -         शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर ला गो...
गोंडपिपरी येथील बैठकीत एकमुखी निर्णय
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
गोंडपिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) -
        शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर ला गोंडपिंपरी तालुक्यातील खैरे कुणबी समाज बांधवांची बैठक झाली. या बैठकीत खैरे कुणबी समाजातील प्रमुख मान्यवरांनी गोंडपिपरी तालुक्याचा विकास, गावातील विविध प्रश्न, रखडलेली कामे, आमदारांचे दुर्लक्ष यावर आपली मते मांडली. अखेर शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार ॲड. वामनराव चटप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घोषित केला. 

        ॲड.वामनराव चटप आमदार असतांना गोंडपिंपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते व पूलांचे बांधकाम, पाणी पुरवठा योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना, शासकिय इमारती झाल्या. गोंडपिंपरी चे बस स्थानक त्यांच्याच कार्यकाळात झाले. स्वतः जाणीवपूर्वक बस स्थानकाची जागा शोधुन सर्व अडथळे पार करीत ॲड.वामनराव चटप यांनी बसस्थानक बांधकाम पूर्ण करविले आणि तसेच गोंडपिंपरी येथे न्यायालय, तहसिल कार्यालय, आयटीआय, शासकीय वसतीगृह मंजूर करविले. दोन उपसा सिंचन योजनेचे कार्य झाले. मात्र अजूनही अनेक समस्या आहेत आणि गेल्या पाच वर्षांत आमदारांनी उल्लेखनीय असे कोणतेच काम केले नाही. आता पुन्हा त्यांनाच संधी दिल्यास गोंडपिंपरी तालुक्याच्या पदरात काहीही पडणार नाही, करंजी येथील एमआयडीसी, सिंचन प्रकल्प, बेरोजगार युवकांचे प्रश्न, धान व कापूस या शेतमालाच्या भावाचे प्रश्न, पांदन रस्ते अशा अनेक समस्या सोडवायच्या आहेत.

        अत्यंत विचारपूर्वक खैरे कुणबी समाजाने क्षेत्राचा विकास आणि पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करून ॲड.वामनराव चटप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. ॲड.वामनराव चटप हे अभ्यासु, कर्तव्यदक्ष आणि दिलेल्या शब्दाला जागणारे नेते असून त्यांच्या कार्यकाळात खैरे कुणबी समाज व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीला खैरे कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व कार्यकर्ते सर्वश्री रामभाऊ कुरवटकर, रामकृष्ण सांगडे, मारुती पाटील भोयर, अशोकराव भस्की, सुरज भस्की, सुरेश चरडे, पांडुरंग भोयर (नंदवर्धन), अविनाश बट्टे, संतोषभाऊ सातपुते, नरेश पोटे, विलास पाटील एकोणकर, आकाश कुकुडकर, रूपेश भोयर, मनोज सांगडे, उमेश देशमुख, अनिल पाटील रामगीरकर, संदीप पोरटे आणि गोंडपिंपरी शहर व ग्रामीण भागातील खैरे कुणबी समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते.

#RajuraAssemblyElections2024 #Congress #BJP #ShetkariSanghtna #Rajura #Gondpipari #KhaireKunabi #AdvWamanraoChatap

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top