सोशल मीडियावर जाम वायरल होत आहे व्हिडीओ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ नोव्हेंबर २०२४) -
गुलाबी थंडीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच गरम झालं आहे. सर्वच उमेदवार सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेयत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत आहेत. असाच एक अनोखा फंडा राजुरा विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने आजमाविला आहे. संभाजी ब्रिगेडचे उमेदवार तसेच सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी ट्रक वरूनच प्रचार सुरु केला आहे. ट्रकच्या दोन्ही बाजूला त्यांच्या प्रचाराचे बॅनर लागले असून वरून ऊन लागू नये म्हणून पांढरा कपडा लावण्यात आला आहे. एवढंच नाही तर ट्रकच्या आतमध्ये एक लोखंडी स्टॅन्ड सुद्धा ठेवण्यात आला आहे. ट्रकच्या आतमध्ये त्या लोखंडी स्टॅण्डवर उभे राहून भाषण देण्यासाठी माईक, लाऊडस्पिकर सिस्टम सुद्धा लावण्यात आले आहे. हेलिकॉप्टर नाही, विमान नाही, सर्वात जास्त जे वाहन राजुरा विधानसभेत चालते त्यालाच आपले प्रचाराचे रथ बनवून प्रस्थापितांना आवाहन देत आहे. कम मे बम, अब बन गया फुसे एटम बम, लावली सुरंग, पुन्हा एकदा केला गनिमी कावा अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे.
मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला असला तरी हा फंडा पैश्याची बचत सुद्धा करत आहे. जिथे जास्त गर्दी दिसली तिथेच कॉर्नर सभेच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे. असं केल्याने वेगवेगळ्या जागी माईक, लाऊडस्पिकर सिस्टम, खुर्च्या हा सर्व खर्च वाचत आहे. हा एका एमबीए शिकलेल्या उच्च शिक्षित उमेदवार भूषण फुसे यांचा दिमाख असून मतदारांना आकर्षित करण्याचा नुस्का मतदारांनाही हमखास आवडत आहे. भूषण फुसेच्या या अचाट कल्पनेची चर्चा आता महाराष्ट्रभर होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.