चंद्रपूर (दि. २४ नोव्हेंबर २०२४)
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याच्या "बेस्ट सेक्रेटरी" म्हणजेच उत्कृष्ट सचिव या प्रतिष्ठित पुरस्काराने चंद्रपूरच्या डॉ. कल्पना गुलवाडे यांचा गौरव करण्यात आला. डॉ. कल्पना गुलवाडे या अतिशय होतकरू आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. डॉक्टर कल्पना गुलवाडे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विविध वैद्यकीय परिषदांचे यशस्वी आयोजन केले तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी विविध ठिकाणी मोफत रोग निदान शिबिरांचे देखील आयोजन केले.
IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि सचिव डॉ. अनिल आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ. कल्पना गुलवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात डॉ. मंगेश गुलवाडे, IMA महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष, तसेच IMA चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी कार्यप्रदर्शनाबद्दल डॉ. कल्पना गुलवाडे यांचे डॉ. संजय घाटे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. कीर्ती साने, डॉ. अपर्णा देवइकर, डॉ. मनीषा घाटे आणि डॉ. अप्रतिम दीक्षित यांनी अभिनंदन केले. चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या सन्मानाने वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.