Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कवठाळा येथे CCI कापूस खरीदी सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कवठाळा येथे CCI कापूस खरीदी सुरू आमचा विदर्भ - दीपक शर्मा गडचांदूर (दि. 24 नोव्हेंबर 2024) -         जय हिंद कॉटन कवठाळा येथे शासकीय हमीभावा...
कवठाळा येथे CCI कापूस खरीदी सुरू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. 24 नोव्हेंबर 2024) -
        जय हिंद कॉटन कवठाळा येथे शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदीला दि. 22 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत MSP दर 7521/- प्रति क्विंटल नुसार देण्यात येत आहे. जय हिंद कॉटन कवठाळा येथे सीसीआय केंद्रात कापूस विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्यांचे शाल शिफळ देत स्वागत करून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. 

        या वेळी कृषि उत्पन्न बाजार समिति चे सभापति अशोक बावने, CCI इनचार्ज एच. बी. पटेल, जय हिंद कॉटन चे संचालक हंसराज चौधरी व शेतकरी वसंता बतखल, अनिकेत खनके, स्वप्निल झुरमुरे, शुभम थीपे, आकाश गोखरे, शुभम उरकुंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. CCI इनचार्ज आणि कृषि उत्पन्न बाजार समिती सभापति यानी शेतकरी बंधवाना MSP दर नुसार कापुस खरीदी कुरू असल्याचे सांगितले आहे. 

#CCI #CottonCorporationofIndia #JaiHindCottonKawthala #JaiHindCotton #Kawthala #cottonsales #AgriculturalProduceMarketCommittee #KrushiUtpannaBazarSamiti

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top