Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आज खऱ्या अर्थाने '''दादा'' ची भाऊबीज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लाडक्या बहिणींनी पलटविली बाजी काँग्रेसच्या आगाऊ कार्यकर्त्यानी केला सुभाष धोटेंचा घात  आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२...
लाडक्या बहिणींनी पलटविली बाजी
काँग्रेसच्या आगाऊ कार्यकर्त्यानी केला सुभाष धोटेंचा घात 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ नोव्हेंबर २०२४) -
        राजुरा विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी विजय मिळवत ऐतिहासीक विजय मिळविला. त्यांना भाजपची उमेदवारी मिळताच त्यांना पार्सल व बाहेरचा उमेदवार म्हणत मोठा विरोध सुद्धा झाला होता. अशातही अखेरपर्यंत हार न मानता त्यांनी केलेल्या नियोजनाला यश मिळाले व देवराव भोंगळे हे विजयी झाले. त्यांच्या विजयाने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांना मोठा धक्का बसला असून ''विकासाचा वादा - देवराव दादा'' असा नारा देवराव भोंगळे यांनी दिला होता त्यात त्यांना यश मिळाले. 

        सुरुवातीला स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अँड. वामनराव चटप हे अल्पशा मताने आघाडीवर होते. तर त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे सुभाष धोटे होते. नंतर चुरशीच्या लढतीत सुभाष धोटे यांनी बढत हासील केली व ते प्रथम नंतर चटप व तिसऱ्या क्रमांकावर भोंगळे होते. नंतर चटप यांच्यावर मत करत भोंगळे दुसऱ्या क्रमांकावर आले व अवघ्या काही फेरीतच देवराव भोंगळे यांनी मतांची मुसंडी मारली. 

        राजुरा विधानसभा मतदारसंघात आधीपासूनच कमालीची स्पर्धा निर्माण झाली होती. भाजपने देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर येथील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता पण अटीतटीच्या या निवडणुकीत शेवटी देवराव भोंगळे यांनीच विजय मिळविला राजुरा येथील प्रस्थापित नेत्यांवर मार करीत ते आता राजुरा विधानसभा मतदारसंघाचे दादा झाले आहेत. ''विकासाचा वादा - देवराव दादा'' असा नारा देत त्यांनी निवडणूक लढवी लढविली त्यात ते आता यशस्वी ठरले. 

काँग्रेसच्या आगाऊ कार्यकर्त्यानी व गोंडपिपरीकरानी केला सुभाष धोटेंचा घात
        सुभाष धोटे व अरुण धोटे यांची या विधानसभा क्षेत्रामध्ये चांगली पकड आहे. गोंडपिपरी हा खैरे कुणबी बहुल क्षेत्र असून हा क्षेत्र काँग्रेसचा गढ मानला जात होता. या क्षेत्रातून २०१९ च्या निवडणुकीत गोंडपिपरीतुन सुभाष धोटे याना बरीच मते मिळून आली होती. मात्र तिथल्या नागरिकांचे प्रश्न ते सोडवू शकले नाही तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान ते थेट आतापर्यंत काँग्रेसचे माज आलेले आगाऊ पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यकर्ते वैयक्तिक टीकाटिप्पणी करत सोशल मीडियावर सभ्य लोकांचे शिंतोडे उडवत होते. नेमकी बाब सभ्य लोकांनी हेरली आणि तोंडावर आलेल्या निवडणुकीत माज आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्या व कार्यकर्त्यांना धडा शिकविण्याकरिता नवीन चेहऱ्याला पसंती दिली. २०१९ च्या निवडणुकीत २२०० च्या जवळपास मताने निवडून आलेले धोटे याना या निवडणुकीत ३७६२ मतांनी पराभव स्वीकारण्याची नामुष्की आगाऊ माज आलेल्या कार्यकर्त्यांमुळे सुभाष धोटे यांच्यावर आली. 

#Rajuraassemblyconstituency #BJP #Congress #ShetkariSanghatna #SwatantraBharatPaksha #SambhajiBriged #GondwanaGantantraParty #BSP #DeoravBhongale #SubhashDhote #AdvWamanraoChatap #BhushanFuse #GajananJumnake #PravinKumare #Rajura #Gondpipari #Korpana #Jiwati #Gdchandur 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top