Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डॉ. रमेशकुमार बोरकुटे याना भारत विभूषण पुरस्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष करणार सन्मानित 22 नोव्हेंबर ला सीएम कॉन्फरन्स हाल न्यू दिल्ली येथे आयोजन आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. 21...
दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष करणार सन्मानित
22 नोव्हेंबर ला सीएम कॉन्फरन्स हाल न्यू दिल्ली येथे आयोजन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 21 नोव्हेंबर 2024) -
यहोवा यिरे फाऊंडेशन चे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर याना दिल्ली विधानसभेतील सीएम कॉन्फरन्स हाल येथे दि. 22 नोव्हेंबर ला भारत विभूषण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर याना हा पुरस्कार त्यांनी केलेल्या महाराष्ट्रातील वित्तीय सेवांमध्ये नवोपक्रम आणि अनुकरणीय योगदानाबद्दल दिल्ली विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री राम निवास गोयल व इतर मान्यवरांसह मान्यवर आणि आदरणीय पाहुण्याच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे सदर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून याबाबतचे पत्र डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर याना isrhe org चे अध्यक्ष अतुल कुमार शर्मा यांच्याकडून मिळाले आहे. डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर याना त्यांच्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #JehovahYireFoundation #JehovaYireFoundationPresidentElijahBorkute #DrRameshKumarBorkute

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top