Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 64.48 टक्के मतदान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २० नोव्हेंबर २०२४) - महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी...
अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २० नोव्हेंबर २०२४) -
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.20) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आहे.

70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 7 हजार 344 पुरुष मतदार, 1 लक्ष 6 हजार 12 स्त्री मतदार व 2 इतर मतदार अशा एकूण 2 लक्ष 13 हजार 358 मतदारांनी (65.59 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.

71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 296 पुरुष मतदार, 98 हजार 4 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 300 मतदारांनी (53.57 टक्के) मतदान केले.

72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 98 हजार 179 पुरुष मतदार, 99 हजार 989 स्त्री मतदार व 3 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 98 हजार 171 मतदारांनी (63.44 टक्के) मतदान केले.

73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 97 हजार 592 पुरुष मतदार, 1 लक्ष 3 हजार 573 स्त्री मतदार अशा एकूण 2 लक्ष 1 हजार 165 मतदारांनी (72.97 टक्के) मतदान केले.

74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 2 हजार 431 पुरुष मतदार, 1 लक्ष 7 हजार 697 स्त्री अशा एकूण 2 लक्ष 10 हजार 128 मतदारांनी (74.82 टक्के) मतदान केले.

तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात 84 हजार 825 पुरुष मतदार, 84 हजार 991 स्त्री मतदार व 1 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 69 हजार 817 मतदारांनी (60.21 टक्के) सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लक्ष 92 हजार 667 पुरुष मतदारांनी, 6 लक्ष 266 स्त्री मतदारांनी आणि 6 इतर मतदारांनी अशा एकूण 11 लक्ष 92 हजार 939 मतदारांनी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान केले. जिल्ह्याची मतदानाची सरासरी टक्केवारी 64.48 आहे.

#RajuraAssemblyElections2024 #Congress #BJP #ShetkariSanghtna #SambhajiBriged #Shivsena #Aamaadamiparty #MaharashtraAssemblyGeneralElection #Matdan #ChandrapurAssemblyElections2024 #BallarpurAssemblyElections2024 #BrahmapuriAssemblyElections2024 #WaroraAssemblyElections2024 #ChimurAssemblyElections2024

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top