आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ नोव्हेंबर २०२४) -
राजुरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा आर्वी येथील नागेश्वर ऊर्फ नागेश विनायक माथनकर वय 33 वर्ष याच्या घराची अवैध दारु बाळगल्याबाबत झडती घेतली असता त्याचे राहते घराचे पाठीमागे एकुण 20 नग खडर्याचे खोक्यात जवळपास एक लाख किमतीची अवैध दारू चा मुद्देमाल मिळुन आला.
सदरचा इसम हा पो.स्टे. रेकार्डवरील गुन्हेगार असुन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मा. उपविभागीय दंडाधिकारी स.राजुरा यांनी त्यास दिनांक 24/11/2024 पर्यंत राजुरा हद्दीमध्ये प्रवेश बंदी केलेले असतांना सुध्दा तो आदेशाचे उल्लंघन करून अवैधरित्या देशी दारु विक्री करीता बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पो.स्टे. राजुरा येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही चंद्रपुर जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा विभाग दिपक साखरें यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे अन्वेशन विभाग राजुराचे प्रमुख स.पो.नि. रमेश नन्नावरे, पोउपनि भिष्मराज सोरते व पोलीस अंमलदार किशोर तुमराम, अनुप डांगे, कैलास आलाम, महेश बोलगोडवार, शफीक शेख, योगेश पिदुरकर, शरद राठोड यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.