आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २५ नोव्हेंबर २०२४) -
आज दिनांक 25/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने पो. स्टे. रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपिनीय माहिती वरुन आरोपी नरेश भीक्षपति तूरपाटी वय 25 रा.यादगिरी ता. यादाद्री जिल्हा नलगोंडा राज्य. तेलंगाना हल्ली मु. नरेंद्र नगर, जैन लेआऊट बायपास रोड चंद्रपूर याच्या कडे गावठी देशी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली असता आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे घर झडती घेतली असता एक बनावटी देशी कट्टा मिळून आल्याने देशी कट्टा जप्त करुन आरोपीस ताब्यात घेऊन पोस्टे रामनगर येथे अप क्रं १११८/२०२४ कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील कारवाई करीता पोस्टे रामनगर यांचे ताब्यात दिले. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस हवालदार दीपक डोंगरे, ना.पो.का. संतोष येलपुलवार, पोका. गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.