राजुरा (दि. २७ नोव्हेंबर २०२४) -
बामनवाडा स्थित समानता बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा द्वारा संचालीत नॅशनल पब्लिक स्कूल येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक मोहमद मेहमूद मुसा तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक नदीम शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती वाघमारे, सहायक शिक्षक वैभव तिडके उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे संविधानावर आधारित भाषणे, कविता व नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. संविधानातील विविध तरतूदी व त्याविषयी मार्गदर्शन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर संस्थेचे संस्थापक मोहमद मेहमूद मुसा यांनी प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष नदिम शेख यांनी देखील संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती वाघमारे यांनी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय प्रायव्हेट आयटीआय चे सर्व प्राध्यापक वर्ग तसेच राष्ट्रीय नर्सिंग स्कूलच्या व नॅशनल पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका कु. स्नेहा बोरसे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.