Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लाडकी बहीण योजना राबवणारे एकनाथ शिंदे यांनी सोडले मुख्यमंत्रीपद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार? ठाणे कार्यालयात एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषद आमचा विदर्भ - वृत्त सेवा ठाणे (दि. २७ नोव्हेंबर २०२४) -      ...

आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार?
ठाणे कार्यालयात एकनाथ शिंदे यांचे पत्रकार परिषद
आमचा विदर्भ - वृत्त सेवा
ठाणे (दि. २७ नोव्हेंबर २०२४) -
        महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये वातावरण तापले आहे. यासंदर्भात आज ठाणे कार्यालयात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत, “मी स्व:तला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केले. यामुळे मला कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काहीतरी केले पाहिजे, या उद्देशाने महायुती सरकारच्या माध्यमातून मी सर्वांसाठी काम केले”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठिंबा – एकनाथ शिंदे
या परिषदेत एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले. महाराष्ट्राला आम्ही भरभरून निधी दिला, अडीच वर्ष (PM Narendra Modi) मोदी आणि शाह ताकदीने उभे राहिले. PM मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय मान्य असेल, काल मोदी साहेबांनी कॉल केला होता, मोदी शहांचा निर्णय अंतिम असेल, मी कार्यकर्ता म्हणूनच काम केला आहे. अनेक प्रकल्प आणि कल्याणकारी योजना आम्ही राबवले आहेत, असे शिंदे म्हणाले.


उद्या दिल्लीत तिन्ही पक्षांची बैठक होणार
        शिंदे (Eknath shinde) पुढे म्हणाले की, आम्ही राज्य पहिल्या क्रमांकावर नेले, याचे समाधान आहे. ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ अशी माझी ओळख निर्माण झाली. ही नवी ओळख मला सर्वात मोठी वाटते. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. आम्ही लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. आम्ही घरी बसलो नाही. आम्ही मनापासून काम केलं. मी शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळाले, हे महत्त्वाचं आहे, असे ते म्हणाले.

        पुढे एकनाथ शिंदे (Eknath shinde) म्हणाले की, “सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसाला काहीतरी मिळावे ही भावना मी पूर्ण केली. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो. दिघे साहेबांचे विचार आमच्याकडे होते. आम्ही उठाव केला तेव्हा नरेंद्र मोदी, अमित शाह आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अडीच वर्षं त्यांनी मुख्यमंत्रीपद दिले. प्रत्येक दिवस, क्षणाचा आम्ही जनतेच्या हितासाठी वापरला. पाठबळ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अडीच वर्षांच्या काळात प्रगतीचा वेग वाढण्यामागे राज्य आणि केंद्रातील समविचारी सरकार आहे,” असेही (Eknath shinde) ते म्हणाले.

#EknathShinde #PatrkarParishad #Mukhyamantri #LadkiBahinYojna #Maharashtra #BJP #Shivsena #Mahayuti

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top