Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चिंचोली (बु.) येथे समाज प्रबोधनातून गावकऱ्यांनी घेतले ग्राम उन्नतीचे धडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०५ ऑकटोबर २०२४) -         मौजा चिंचोली बु. येथे दिनांक २ ऑकटोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०५ ऑकटोबर २०२४) -
        मौजा चिंचोली बु. येथे दिनांक २ ऑकटोबर ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती तथा सर्व पित्रे अमावस्या दिवसाचे औचित्य साधून गावातील सामाजिक कार्य करणारे युवा मंडळीने सप्त खंजिरी वादक डॉ. रामपाल महाराज धारकर यांचे कीर्तनाच्या माध्यमातून गावात सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व गावकऱ्यांनी येथील जागरूक युवकांचे कौतुक केले. या सामाजिक प्रबोधनात विद्यार्थी यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे, बालकांत संस्कार घडविण्याचे त्याचप्रमाणे बालकांना लौंगिक अत्याचार पासून सुरक्षित ठेवण्यास पालकांची जबाबदारी, पुरुष-महिला व्यसनाधीनता बाबत जाणीव जागृती निर्माण करून गावाच्या विकासासाठी एकत्रित कार्य करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. चिंचोली हे गाव पूर्वीपासून संतांचे गाव व माजी आमदार स्वर्गीय प्रभाकरराव मामुलकर यांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गुरुदेव सेवा मंडळ कार्यरत असून नियमित प्रार्थना होत असते. सदर कार्यक्रमाचे आयोजन गावातील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार ठाकूर, शंकर धनवलकर, विठ्ठल चिंचोलकर आदी आयोजन समितीचे सदस्यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पिलाजी भोंगळे, उपसरपंच पुष्पाताई धनवलकर, पोलीस पाटील संतोष नेवारे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण सोमलकर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी गावासाठी चांगले कार्य करणारे गावकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून अँड. राजेंद्र जेनेकर, आदर्श शिक्षण मंडळाचे सचिव अविनाश जाधव, विरुरचे ठाणेदार वाकडे साहेब, चिंचोलीचे वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक दादाजी झाडे, मत्ते सर, जनार्दन बोबडे यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप बोटपल्ले यांनी केले. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Chincholi #ChincholiBujrug #GurudeoSevaMandal #Prabodhan #CommunityEnlightenment #MahatmaGandhiandLalBahadurShastriJayanti #2Octo #AvinashJadhav

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top