आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ ऑकटोबर २०२४) -
जिथे स्वच्छता असते तिथे देवाचाही वास असतो. स्वच्छतेच्या कामात स्वच्छता कर्मचारी सर्वाधिक योगदान देत आहेत. हे लोक वेळेची पर्वा न करता रस्ते, नाली, नाले साफ करण्यात व्यस्त दिसतात. हीच बाब लक्षात घेऊन जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ द्वारे नगर परिषद स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
शनिवारी सायंकाळी जय भवानी दुर्गा उत्सव मंडळ द्वारे आयोजित गरबा दांडिया महोत्सव दरम्यान अगोदर सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या हस्ते स्वच्छतेतील मेहनती सैनिकांना शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. सन्मान मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उत्साह वाढला. सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी सांगितले कि, स्वच्छता कर्मचारीच रोज सकाळी इतरांच्या घरांची स्वच्छता करतात. देशाचे खरे नागरिक म्हणून स्वच्छतेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. ते म्हणाले की, नवरात्रीच्या पर्वावर आपण अश्या कर्मचाऱ्यांचा आदर करत आहो ज्यांचा सन्मानाचा कोणी विचार करत नाही, हे पाहून खूप आनंद होत आहे. केवळ स्वच्छता कर्मचारीच या सन्मानास पात्र आहेत.
सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी म्हटले कि, ज्या प्रकारे सैनिक देशाच्या सीमेवरून शत्रूंना पळवून लावतात, त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचारीही देशातून अस्वच्छतेच्या राक्षसाला हुसकावून लावतात. स्वच्छता कर्मचारी हेच स्वच्छता अभियानाचे खरे संरक्षक आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होते. या प्रसंगी राकेश चिलकुलवार, नितीन प्रिपरे, विलास खिरटकर, चौधरी, मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तथा शेकडो नागरिक उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #JayBhavaniDurgaMandal #NagarParishadSwachtaKarmachari #Municipalcouncilvolunteers #Cleaningstaff #SwachtaAbhiyan #Navratri
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.