Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जिवती तालुक्यात आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत जिवती (दि. ५ ऑकटोबर २०२४) -         जिवती ताल...
दोषींवर कडक कारवाई करा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
जिवती (दि. ५ ऑकटोबर २०२४) -
        जिवती तालुक्यातील स्व. सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये वर्ग 12 वी मध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन संशयास्पद मृत्य झाल्याची घटना घडली आहे. कोदेपुर येथील सांगाडा पाटील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जिवती तालुक्यासह परिसरातील विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत असतात, परंतु आज एका निरपराध विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने तालुक्यात संस्थाचालकाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सदर शाळेच्या वसतिगृहाचे अधीक्षक दोन दिवसांपासून रजेवर गेले आहे, परंतु आपला चार्ज संबधित अधिकाऱ्याकडे न सोपवता त्यांनी मनमर्जीने रजेवर गेल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला. 

        सदर घटनेची सखोल तात्काळ चौकशी करून शाळेच्या संस्थाचालकांवर तसेच मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसोबत व्यवस्थित व्यवहार केला जात नाही. विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. एकीकडे अश्या शाळेंना विद्यार्थी मिळणे कठीण झाले असून आता अश्या घटनेने पुन्हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी व्यक्त केले आहे. फुसे यांनी शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #AshramSchool #SwaSangadaPatilSecondaryAshramSchool #Student #hanging #Koddepur #SchoolHostels #jiwatipolisstation

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top