सर्व जखमी विध्यार्थ्यांच्या उपचाराची जिम्मेदारी एका डॉक्टर वर
सरकारी दवाखान्यात लाईट हि नसल्याने रुग्णांचे हाल
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी घेतली जखमी ची भेट
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदूर (दि. ०५ ऑकटोबर २०२४) -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सकाळची शाळा आटोपून विद्यार्थ्यांना सोडणारी स्कूल बस हरदोना येथे पलटली. या बसमध्ये जवळपास ४० विद्यार्थी होते. यात अनेक विद्यार्थी जखमी असून जवळपास तीन एम्बुलन्स ने जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत पालकांची भेट घेतली. ज्यावेळी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा दवाखान्यात वीज नसल्याने रुग्णाचे हाल बेहाल होते. जवळपास २५ ते ३० जखमी विद्यार्थ्यांचा उपचार फक्त एकच डॉक्टर करीत होता. एक्सरे मशीनचे सुद्धा समस्या होती. काही आर्थिक दृष्ट्या सबळ पालकांनी पाल्याना उचलत खाजगी रुग्णालयात नेले. लहान सहान अपघात हे होतच असतात मात्र अपघात झाल्यावर तातडीने जो उपचार मिळायला हवा तोच वेळेवर मिळत नसल्याने आता सर्वप्रथम रेफर टू चंद्रपूर धोरणावर चालणाऱ्या सरकारी रुग्णालयाचाच उपचार करण्याची मागणी फुसे यांनी केली.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #Accident #Hardona #LalBahadurShastriVidyalay #SchoolBus
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.