भारतीय जनता पक्षाच्या मध्यस्थीने संपाची यशस्वी सांगता
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 03 ऑक्टॉबर 2024) -
धारिवाल कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा मागील 24 सप्टेंबरपासून सुरू असलेला संपाची यशस्वीरीत्या सांगता झाली. भारतीय जनता पक्षाच्या हस्तक्षेपाने आणि डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या प्रयत्नाने तसेच विशाल निंबाळकर, भारतीय मजदूर संघाचे हेमराज गेडे, राकेश बोमनवार, प्रवीण उरकुडे, अमित निरंजने, पवन ढवळे, रामकुमार आकापल्लीवार यांच्या वाटाघाटींमुळे कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यांच्या पगारात 13 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरपना शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण ; सोशल मीडिया वर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा - भूषण फुसे
कोरपना शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण ; सोशल मीडिया वर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा - भूषण फुसे
कामगारांच्या संपामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती सोडवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश गुलवाडे आणि विशाल निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगारांमध्ये समन्वय साधण्यात आला व कामगारांनी आपला संप मागे घेतला.
संप मिटल्याने धारिवाल कंपनीच्या कामकाजात नियमितपणा परत आला असून सर्व कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शंकर खंडारकर, सुरज गादेवार आणि विशाल मेश्राम या कामगार प्रतिनिधींनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वाटाघाटी करणाऱ्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #DrMangeshGulwade #MangeshGulwade #SudhirMungantiwar #DhariwalCompany #BhartiyJantaParty #BJP #Contractworkers #strike #CompanyManagement #Laborrepresentatives
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.