Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मजुरांचे घामाचे पैसे न देणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका - भूषण फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूरात घंटा गाडी मजुरांचा दोन महिन्यापासून पगारच नाही आमचा विदर्भ - दीपक शर्मा  गडचांदूर (दि. ०३ ऑक्टॉबर २०२४) -          गडचांदूर नगर प...
गडचांदूरात घंटा गाडी मजुरांचा दोन महिन्यापासून पगारच नाही
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
गडचांदूर (दि. ०३ ऑक्टॉबर २०२४) - 
        गडचांदूर नगर परिषद अंतर्गत घराघरातून कचरा संकलनाचे कार्य कंत्राटी पद्धतीने कंत्राटदाराला देण्यात आले आहे मात्र कंत्राटदाराने दोन महिन्यापासून मजुरांचे पगारच केले नसल्याचे मजुरांनी सांगितले. मजुरांनी याबाबत नगर परिषदेत विचारणा केली असता कंत्राटदाराने कामाचे बिल उचलले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बिल उचलूनसुद्धा मजुरांना त्यांच्या घामाचे पैसे न देणाऱ्या कंत्राटदारावर नप ने त्याची अमानत जप्त करत मजुरांचे घामाचे पैसे देण्यात यावे अन्यथा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. 

कोरपना शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण ; सोशल मीडिया वर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा - भूषण फुसे

        स्थानिक नगर परिषदेच्या घंटा गाडीतून घराघरातून कचरा संकलनाचे कार्य ठेकेदारामार्फत सुरू आहे. मात्र दोन महिन्यापासून कंत्राटदाराने आमच्यावर उपासमारीची पाळी आणल्याचे आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांची भेट घेत दिले. मजुरांनी फुसे याना सांगितले कि, एक महिन्यानंतर दिवाळी आहे, नगराध्यक्षा व नगर परिषद प्रशासनाचे मजुरांच्या समस्येकडे लक्ष नसल्याने घामाचे पैसे वेळेवर मिळत नाही आहे. फुसे यांनी निवेदन स्वीकारत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन तुमचे पैसे मुळवून देऊ असे आश्वासन दिले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #NagarParishadGadchandur #GhantaGadi #GadiWalaAayaNikal #Majur #Thekedar #Contractor #laborer #SwachtaAbhiyan #Meyor #Mukhyadhikari #money #Nosalary
03 Oct 2024

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top