कुकूडसाथ येथे शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार व बेरोजगार मेळावा
फुसेनी घेतला, स्वतःला विकास पुरुष म्हणणाऱ्यांचा समाचार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०१ ऑक्टॉबर २०२४) -
आपल्या देशात बुलेट ट्रेन, वंदे भारत ट्रेन, हायवे हजारो कोटी से रस्ते झाले मात्र जगाचा पोशिंदा आजही कच्या पांदण रस्त्याने शेतात जात आहे. शेतकरी शेतात राबताना दुर्दैवाने वाघाच्या हल्यात ठार झाला तर आर्थिक मदत मिळते मात्र साप चावून मारला गेला तर काहीच मिळत नाही, रान डुक्कर शेतात अतोनात नुकसान करत आहे त्याला मारायची परवानगी वन विभागाकडून घ्यावी लागते, म्हणे आम्ही इंग्रजांच्या जमण्याचे कायदे बदलवले अरे तर स्वतःला विश्वगुरू समझणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांविषयी जाचक कायदे का नाही बदलले? भाजप व काँग्रेस हे आरक्षण विरोधी असून जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे कार्य करीत आहे त्यांचा पासून लोकांनी सावध राहावे. नेहरू पासून ते राजीव गांधी पर्यंत काँग्रेस ने देशात राज्य केले मग मागासवर्गीयांना आरक्षण देण्याऱ्या मंडळ आयोगाचा शिफारशी काँग्रेस ने का लागू केल्या नाही? व्ही.पी. सिंग सरकारने मंडळ आयोगाचा शिफारशी लागू करून आरक्षण देशात राबविले तेव्हा काँग्रेस ने त्यांचे समर्थन काढून सरकार पाडले. चंद्रपूर जिल्ह्यात व राजुरा विधानसभा क्षेत्रात स्वतःला विकासपुरुष म्हणवून घेणाऱ्या आजी माजी लोकप्रतिनिधींनी स्थानिकांच्या रोजगारासाठी विधानसभेत कडाडून आवाज का उठवला नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी केले ते कोरपना तालुक्यातील कुकूडसाथ येथे शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार व बेरोजगार मेळाव्यात बोलत होते.
कुकूडसाथ येथील शेतकरी भवनात शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार व बेरोजगार मेळाव्याचे आयोजन बांधकाम कामगार संघटना व किसान मजदूर संघटने तर्फे ३० सप्टेंबर ला करण्यात आले होते. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे, शेतकरी व कामगार नेते किशोर निब्रड, तुळशीराम भोजेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे खुशाल गौरकार, रामदास डावळे, रामदास चौधरी, खुशाल गौरकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक रंजूभाऊ लखमापुरे, वासुदेव बोधे, रामदास डावरे, धनंजय बोरडे, समाजसेवक नामदेव कोडापे, सामाजिक कार्यकर्ता प्रदीप कुंभे, पत्रकार वीरेंद्र पुणेकर, शाहिदा शेख, प्राजक्ता भोजेकर, छाया निब्रड, सविता टेकाम, रेखा राजूरकर, रंजना ठाकरे, रोशनी काळे, रेखा कुंभेकर, सुनंदा कुचनकार, निर्मलाताई सिडाम, मंदा क्षीरसागर, नीता आसुटकर, अर्चना कापसे, शितल लोणारे, संगीता बुटले, अश्विनी माणूसमारे, संध्या मडावी, फातमा उदे, पौर्णिमा ढेंगळे, प्राजक्ता भोजेकर मंचावर उपस्थित होते.
देशात 151 लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाविरोधातील गुन्हे दाखल आहेत. भाजप ५४, काँग्रेस २३, तेलगू देशम १७, आम आदमी पक्ष १३, तृणमूल काँग्रेस १०, शिवसेना ३, राष्ट्रवादी १ लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहे. (स्रोत बीबीसी न्यूज) वरील आकडे आपण देशात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे आहे. एकी कडे आपण महिलांना देवी म्हणून पुजतो तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शेकडो महिलांवर अत्याचार होत असून महिला अत्याचार विषयी कठोर पावले उचलणे जरुरी आहे. आणि म्हणे आम्ही महिलांचे कैवारी हे दाखविण्याकरिता लाडकी बहिणी सारखी योजना राबवून देशात संपन्न महाराष्ट्राला गुजरातपेक्षा मागे टाकण्याचे हे युती सरकारचे षडयंत्र असून असली तुटपुंजी मदतकरण्यापेक्षा शेतमालाला भाव द्या, बेरोजगार युवकांच्या हाताला स्थानिकपातळीवरतीच रोजगार द्या. भीक नाही घामाचे दाम द्या, शेतमाल आयात-निर्यात धोरण हे शेतकऱ्यांच्या हितांचे नसून उद्योगपती, व्यापाऱ्यांचा हिताचे आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे, शर्मेची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी बनणारे नेतेही मूग गिळून बसतात, राजुरा विधानसभा क्षेत्रात सत्तेवर आपली पकड असावी म्हणून प्रस्थापित नेते भाऊ, मुलं, नातेवाईकांना सामोरे करीत आहे. वर्षानुवर्षे पक्षात एकनिष्ठतेने कार्य करणारे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी आहे का? असेही फुसे म्हणाले.
यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या शाहिदा शेख यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार शेतकरी व कामगार नेते किशोर निब्रड, संचालन सुनंदा सोयाम यांनी केले. यावेळी परिसरातील जवळपास दोन हजाराच्या वर महिला, शेकडो नागरिक उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #congress #BJP #ShetkariSanghtna #Shivsena #VikasPurush #MandalAayog #Farm #Farmer #PandanRoad #Englishassemblylaws #Farmers #farmlabourers #constructionworkers #unemployed #gather
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.