नराधमांला फाशीची शिक्षा द्या - भूषण फुसे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना (दि. ०२ सप्टेंबर २०२४) -
बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतांना आता कोरपना तालुक्यात देखील एक अशीच घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन शाळेतच अत्याचार केल्याची तक्रारीची नोंद करण्यात आली असून आरोपी शिक्षक अमोल लोडे याच्यावर कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षक पसार झाला आहे.
या घटनेचे वृत्त असे की पीडित मुलगी ही ११ वर्षांची आहे. पीडित मुलगी कोरपनातील इमिनन्स इंटरनॅशनल स्कुल येथे शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना शाळेत दर रविवारला ज्युनियर आयएएस चे निशुल्क क्लासेस सुरू होणार असल्याचे पाचव्या वर्गावरील विद्यार्थी क्लासेस करू शकतात असे तिला सांगण्यात आले. आई-बाबांनीही क्लासेस मध्ये जाण्याकरिता होकार दिला. मुलीचे वडील दर रविवारला मोटारसायकलने इमिनन्स इंटरनॅशनल स्कुल येथे आणून सोडत होते. ज्युनियर आयएएस चे क्लासेस करिता शाळेतील अमोल लोडे घ्यायचे. मे महिन्याच्या एका रविवार ला इमिनन्स इंटरनॅशनल स्कुल येथे क्लासेस करिता विद्यार्थिनी आली असता अमोल लोडे क्लास सुरू असताना क्लास मध्ये आले व पीडित विद्यार्थिनीला तुझे पापा बाहेर आले असे सांगत क्लासेस बाहेर नेले. अमोल लोडे याने पीडितेला ऑफिस मध्ये नेले तेव्हा ऑफिस मध्ये कुणीही नव्हते. अमोल लोडे याने एक गिलास पाणी व दोन गोळ्या खायला सांगितल्या पीडितेने ह्या गोळ्या कश्याचा आहे विचारणा केली असता अमोल लोडे याने रागाने खाते कि नाही रागावून सांगितले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने एक गोळी खालली व एक गोळी नजर चुकवत फेकून दिली. गोळी खाल्यावर बेशुद्ध अवस्थेत अमोल लोडे याने शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे घृणित कृत्य केले. विद्यार्थिनी शुद्धीवर येताच सदर प्रकार कुणालाही सांगितल्यास तुझ्या आई बाबाना मारून टाकण्याची धमकी दिली. घाबरलेल्या विद्यार्थिनीने काही दिवस सदर प्रकरण कुणालाही सांगितले नाही. काही दिवसांनी आई ला झालेले प्रकरण सांगताच संतापलेल्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादवी १८६०, कलम ३७६एबी, ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२१ कलम ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित शिक्षकाने आणखी असे केले आहेत का याबाबत पोलीस तपासात उघड होईल. समोरचा तपास ठाणेदार दारासिंग राजपूत करीत आहे.
आरोपी शिक्षक अमोल लोडे कोरपना काँग्रेसचा नवनियुक्त शहर अध्यक्ष
येणारी विधानसभा निवडणूक पाहता विविध पक्षात पद देणे सुरु असून आरोपी शिक्षक अमोल लोडे याला कोरपना काँग्रेसचा नवनियुक्त शहर अध्यक्ष पद देण्यात आले आहे. शिक्षक अमोल लोडे हा कोरपना तालुक्यातील जेष्ठ काँग्रेसच्या नेत्याचा जवळचा असल्याचे बोलले जात आहे. आरोपी अमोल लोडे हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. स्वतःचे कॉन्व्हेंट स्कूल चालवणाराच असे कृत्य करत असेल तर त्याला एवढी हिम्मत देते तरी कोण? कोरपणा येथील राजकारणी याला पाठराखण करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपीची वहिनी महिला बालकल्याण सभापती असून त्याच शाळेत शिक्षक आहे. राजुरा येथेही पाच वर्षांपूर्वी एका कॉन्व्हेंट शाळेत आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्या प्रकरणी गार्डन व चौकीदार मागील पाच वर्षापासून तुरुंगात आहे. आणि आता त्याच युवक काँग्रेस पक्षाचा पदाधिकाऱ्यांकडून हा प्रकार घडला असून शाळेतच विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याने पालकांत असंतोषाची लाट पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी ३० सप्टेंबर ला कोरपना तालुक्यातील कुकूडसाथ येथे साधारण सोडा देशातील वर्तमान खासदार, आमदारनवर महिला अत्याचाराचे किती गुन्हे दाखल आहे ह्याचा खुलासा केला होता. देशात १५१ लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाविरोधातील गुन्हे दाखल आहेत. भाजप ५४, काँग्रेस २३, तेलगू देशम १७, आम आदमी पक्ष १३, तृणमूल काँग्रेस १०, शिवसेना ३, राष्ट्रवादी १ लोकप्रतिनिधींवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहे. (स्रोत बीबीसी न्यूज) वरील आकडे आपण देशात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे आहे. एकी कडे आपण महिलांना देवी म्हणून पुजतो तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज शेकडो महिलांवर अत्याचार होत असून महिला अत्याचार विषयी कठोर पावले उचलणे जरुरी आहे. फुसे यांनी आरोपी शिक्षक अमोल लोडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #congress #torture #Rape #Badlapursexualassault #Korpanasexualssault #Student #Accusedteacher #EminenceInternationalSchoolKorpana #Posco #KorpanaPolisStation
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.