आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ ऑक्टॉबर २०२४) -
हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर, सकळगुणमंडित, सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज. चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराज! महाराष्ट्र घडवणारा राष्ट्रपुरुष म्हणजे शिवाजी महाराज! 'हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा...' असं म्हणून शिवाजीराजे थांबले नाही; तर त्यांनी ते राज्य मिळवलं, राखलं आणि प्रस्थापित केलं. 'रयतेचा राजा' हा त्यांना तेव्हा, म्हणजे ४००-४५० वर्षांपूर्वी मिळालेला बहुमान आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा या उद्दात हेतूने महिलांवरील अत्याचार दूर व्हावेत, समाजात सामाजिक सलोखा राहावा, शेतकरी व शेतमजूर सुखी समृद्ध राहावे, भारताची कीर्ती विश्वात नांदावी असे सामाजिक संदेश घेऊन गुरूदेव चौक गुरुदेव नगर धोपटाळा चा आयुष टेकाम हा युवक धोपटाळा ते रायगड धावत जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जावून नतमस्तक होणार आहे. त्याच्या सोबत बाईकवर नकुल सुक्रू धुर्वे हा युवक असणार आहे. २ आक्टोंबर गांधी जयंतीच्या दिवशी त्यांनी हि यात्रा सुरु केली असून राजुरा-गडचांदूर मार्गावर पांढरपोवनी गावाजवळ धावत असताना सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी युवकाची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शाल, श्रीफळ देत त्याला शुभेच्छा दिल्या व त्यांच्या यात्रेचे कौतुक केले. एकीकडे तरुण मुले मोबाईल, बाईक रायडींग, व्यसनाच्या अधीन जात आहे मात्र आयुष टेकाम व नकुल धुर्वे सारखे युवक आगळे वेगळे उपक्रम राबवत तरुणांना नवी दिशा दाखवत आहे, खरंच आपले कार्य कौतुकास्पद असून तरुणांनी यांचा आदर्श घ्यावा असे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी शुभेच्छा देत सांगितले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Raigad #Dhoptala #ShivajiMaharaj #FounderofHinduviSwarajya #AyushTekam #running
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.